
बुलढाणा / प्रतिनिधी
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले सुरेश रमेश पाटील यांची ” पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हाध्यक्ष ” पदी नवीन नियुक्ती करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सांगितले आहे.
सुरेश रमेश पाटील हे धानोरा खुर्द , वसाडी बु. या गावचे माजी उपसरपंच असून ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत त्याच प्रमाणे ग्लोबल फायानांसियल सर्व्हिसचे ते संचालक आहेत.
पोलीसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडवून त्यांना सहकार्य करण्याची आवड असल्याने पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद तानाजी वाघमारे यांनी सुरेश पाटील यांना बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.
यावेळी पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विजुभाऊ नावकार , अकोला जिल्हाध्यक्ष सुनील पाटील तसेच सेवानिवृत्त राखीव पोलीस निरीक्षक { RPI } गजानन इंगळे यांचे हस्ते सुरेश पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या











































