Home बुलडाणा मेहकर जवळ तब्बल 1.43 कोटी रुपयांचा गुटखा जप्त!

मेहकर जवळ तब्बल 1.43 कोटी रुपयांचा गुटखा जप्त!

511

 

एलसीबीची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई!

अमिन शाह

बुलढाणा

 

मेहकर पोलिसांच्या नाकावर टिच्चून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असली तरी, जिल्हा पोलीस दलाचे कान- नाक- डोळे असलेला विभाग अर्थात गुन्हे शाखा सजग असते. त्यामुळे आज मेहकर हद्दीत तब्बल 1.43 कोटी रुपयांचा गुटखा पकडल्याची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली.ट्रक चालकासह 3 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रतिबंधित गुटखा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येत आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे कार्यरत असल्यापासून त्यांनी कारवाईचा धडाका लावला आहे.आज स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, काही इसम हे त्याचे ताब्यातील
अशोक लेलँड कंपनीच्या 2 ट्रकमध्ये शासन प्रतिबंधीत सुगंधीत पान मसाला व गुटखा माल बाळगून त्याची चोरटी विक्री
करण्याच्या उद्देशाने अमरावती कडून समृध्दी महामार्गाने मुंबईकडे जात आहेत. या माहितीवरून मेहकर पोलीस हदीत समृध्दी महामार्गावरील फर्दापूर टोलवर स्था. गु.शा. च्या पथकाने सापळा रचून माहिती प्रमाणे गुटखा व सुगंधीत पान मसाला
भरलेले 2 अशोक लेलँड कंपनीचे ट्रक पकडून त्यावर कारवाई केली. या कारवाईमध्ये दोन ट्रक चालकांसह 3 आरोपी जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून गुटख्याचे 264 पोते किंमत 1,13,09,76 रुपये, अशोक लेलँड कंपनीचे 2 ट्रक किंमत 30,00,000 रुपये असा एकूण 1,43,09,760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.आरोपी विरुध्द मेहकर पोलीस ठाण्यात
भा.न्या.सं.चे कलम 274,275,223,123 सह अन्न व सुरक्षा माणके कायदा 2006 चे कलम 26,27,59 प्रमाणे गुन्हा नोंद
करण्यात आला आहे. मोहम्मद इम्रान मो. हाफिज वय 28 वर्षे, रा. विद्यावानी मोहल्ला, अचलपूर जि. अमरावती,अजीम बेग हाफिज बेग वय 36 वर्षे, रा. अन्सारनगर, अमरावती,एजाज अहेमद अजीज अहेमद वय 31 वर्षे, रा. शिरजगांव ता. चांदूरबाजार जि. अमरावती अशी आरोपींची नावे आहेत.