
अमिन शाह
बुलडाणा , गुजरात व महाराष्ट्र राज्यात पोलिसांना अनेक गुन्हयात हवा असलेला अट्टल दरोडेखोरास
साखरखेर्डा
पोलिसांनी आपल्या जीवाची परवा न करता फिल्मी स्टाइल ने धारदार चाकू व तलवार सह अटक केली आहे ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार लोणी येथील अट्टल दरोडेखोर जखमेश्वर शेनफड़ शिंदे 30 हा अट्टल दरोडेखोर पेनसांवगी ते लोणी रस्त्यावर जात असल्याची माहिती थानेदार गजानन करेवाड यांना मिळाली असता त्यांनी जरा ही विलंब न लावता आपले कर्मचारी गजानन वाघ , कडुबा डोईफोड़े , लक्ष्मण इनामे , व अमडापुर चे थानेदार निखिल निर्मळ यांनी पाठलाग करून आरोपी जखमेश्वर शिंदे यास एक मोठा चाकू , तलवारी सह मोठ्या शिताफिने अटक केली , आरोपी जखमेश्वर शिंदे यांच्यावर अमडापुर , किंगावराजा , साखरखेर्डा
,वड़ोदरा गुजरात येथे अनेक गुन्हे दाखल आहेत तसेच तो वडोदरा गुजरात येथून पोलिसांच्या ताब्यातुन पळून आल्याची ही माहिती प्राप्त झाली आहे पुढील तपास पो , हे ,का,कडुबा डोईफोडे करीत आहे ,











































