
अमरावती शहरातील वैष्णव देवी रोड व वेलकम टी पॉईंट परिसरात यवतमाळ जिल्ह्यातील (एमएच-29) वाहनांवर मोठ्या प्रमाणात ओव्हर स्पीड या कारणावरून दंड आकारण्यात आले आहेत. यातील हजारो वाहनधारकांना नुकत्याच लोकअदालत नोटिसा प्राप्त झाल्या असून, या प्रकरणांची सुनावणी १३ सप्टेंबर २०२५ रोजी ठेवण्यात आली आहे. तसे वाहतूक पोलिसांकडून सर्व वाहनधारकांना एसएमएस द्वारे संदेश प्राप्त झालेले आहेत
यवतमाळ वरून अमरावती चांदुर रेल्वे मार्गे जाणाऱ्या यवतमाळ येथील वाहनांना यावेळी टार्गेट केल्या गेलेले असल्याचे निदर्शनास येत आहे
विशेष म्हणजे, यवतमाळ येथील वाहनांना विशेषतः ‘टार्गेट’ करून अमरावती पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर स्पीड दंड आकारण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. यामुळे यवतमाळच्या नागरिकांबाबत भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली असून अशी पद्धत तातडीने थांबवावी, तातडीने या संदर्भात स्पीड लिमिटचा पुनर्विचार करून योग्य गतीमर्यादा वाढवावी व यवतमाळ जिल्ह्यातील वाहनांवर झालेल्या अन्यायकारक दंडाची पूर्ण माफी जाहीर करावी.
किरकोळ कारणांमुळे देण्यात आलेल्या अशाच चलन दंड आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृह विधान परिषद मध्ये 21 मार्च रोजी मांडलेल्या प्रश्नांवर शासनाने या सर्व वाहनधारकांना दिलासा देण्याचे कार्य केले त्याच धर्तीवर यवतमाळ येथील वाहनांना सुद्धा दिलासा देण्यात यावा
“कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा रस्ते एकेरी व खडबडीत अवस्थेत होते, तेव्हा कमी स्पीड लिमिट निश्चित करण्यात आली होती. मात्र आता रस्ते दुहेरी झाले असून दर्जाही सुधारलेला आहे. अशा परिस्थितीत जुन्या स्पीड लिमिटच्या आधारावर दंड करणे ही अन्यायकारक बाब आहे.”
अनिल गायकवाड यवतमाळ











































