Home बुलडाणा हातावरची मेहंदी ताजी असतांना पोलीस पहोचले नवरदेवाच्या घरी ?

हातावरची मेहंदी ताजी असतांना पोलीस पहोचले नवरदेवाच्या घरी ?

917

अमीन शाह

खामगाव ,

हातावरची मेहंदी ताजी असतांना नवरदेव म्हणून घोड्यावर नुकतेच घोड्यावर बसलेल्या राहुल राजेंद्र रोळे आणि संकेत इंगळे राहणार चीचपूर यांना पोलिसांनी लग्नघरातून उचलून पोलीस ठाण्यात आणून जेरबंद केले रात्रभर लाकअप ची हवा खाल्ल्यानंतर आज दोघा नवरदेवांची जामीनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असून

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार राहुल राजेंद्र रोळे रा. चिंचपूर याचे लग्न १९ मे रोजी होते. यावेळी राहुलने १८ मे रोजी रात्री गावातून धुमधडाक्यात मिरवणूक काढली होती. या वेळी नवरदेव राहुल ने तलवार हातात घेऊन डान्स केला होता राहुलचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
दुसऱ्या प्रकरणात त्याच गावातील संकेत इंगळे रा. चिंचपूर याचेही लग्न २० मे रोजी होते. त्याच्याही लग्नाची मिरवणूक १९ मे रोजी गावातून निघाली होती. त्या वरातीत सुद्धा संकेत ने हातात तलवार घेऊन घोड्यारूनच डान्स केला होता दोघांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हिवरखेड पोलिसांपर्यंत व्हिडीओ पोहोचले. हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास चौधरी यांना माहिती मिळताच दोन्हीही नरदेवांच्या हातावरची मेहंदी सुकण्याच्या आधीच दोघांनाही पोलिसांनी अटक केली रात्रभर लाकअप ची हवा खाल्ल्या नंतर आज दोन्हीही नरदेवांची कोर्टातून जामीनावर सुटका करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली असून याची सर्वत्र चर्चा होतांना दिसत आहे ,