Home यवतमाळ मान्सूनपूर्व स्वच्छता, आरोग्य, रस्ते, नाले साफसफाई चे कामे त्वरित पूर्ण करा –...

मान्सूनपूर्व स्वच्छता, आरोग्य, रस्ते, नाले साफसफाई चे कामे त्वरित पूर्ण करा – मनसे

238

मनसेचा नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाला मनसेचा अल्टिमेटम….

यवतमाळ शहरातील खड्ड्यांमुळे एकही बळी गेल्यास प्रशासन व संबंधित ठेकेदारा विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार…. अनिल हमदापुरे.

यवतमाळ शहरात मान्सून पूर्व नाले साफसफाई तसेच अमृत योजना भूमिगत गटार योजना अंतर्गत शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून शहरातील अंतर्गत रस्त्यातील बरेच रस्ते भूमिगत गटार योजनेसाठी खोदण्यात आले आहेत. त्यातच स्थानिक दर्डा नगर परिसरातील रस्त्याचे काम गेल्या सहा ते आठ महिन्यापासून प्रगती पथावर आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नगरपालिका मुख्याधिकारी क्यातमवार, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्यवहारे, व सार्वजनिक बांधकाम विभाग च्या अधिकाऱ्यांना भेटून यवतमाळ शहरातील खराब रस्ते, खड्डे, अमृत योजना, भूमिगत गटार योजना व नाले साफसफाई कामासंदर्भात आज जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे त्यांच्यासह एका शिष्टमंडळाने भेट ठेवून निवेदन सादर करत वरील शहरातील कामांसंदर्भात अल्टिमेटन दिला.

यवतमाळ शहरातील अनेक नाल्या ,नाले, कचऱ्याचे ढिगारे, अद्याप तसेच असून शहरातील अनेक अंतर्गत रस्ते भूमी गटार योजना व अमृत योजनेच्या कामांसाठी खोदण्यात आले आहेत.भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये थातूरमातूर काम करत अनेक ठिकाणी खड्डे तसेच आहेत. यवतमाळ शहरातील अनेक वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते खराब झाले असुन यावर संबंधित ठेकेदारांनकडून तात्काळ सर्व कामे मान्सूनपूर्व करावे. याप्रसंगी लोहारा,उमरसरा, तालावफैल, गोदाम फैल,चाणक्य नगरी, परिसरातील महिला भगिनींनी खराब रस्ते, सांडपाणी व घाणीच्या साम्राज्या संदर्भात आपल्या व्यथा मनसे कडे मांडल्या. तसेच दर्डा नगर परिसरातील रस्त्याचे काम अनेक महिन्यापासून प्रलंबित असून येथील नागरिकांनी सुद्धा येणाऱ्या मान्सूनची चाहूल लक्षात घेता मनसे कडे धाव घेत संबंधित रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मागणी करण्यात आली. यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीला जोडणारा नाला हा मोठ्या प्रमाणात कचऱ्याने भरला असून आज पर्यंत नगरपालिकेने या नाल्याची पूर्ण स्वच्छता मोहीम राबवली नाही अनेक कंत्राटदाराने नाममात्र साफसफाईचा देखावा करून गाळ तसाच ठेवल्यामुळे नाल्या लगतच्या अनेक कुटुंबाला ऐन पावसाळ्यात याचा फटका बसलाय. शहराच्या मध्यवस्तीत जाणाऱ्या या नाल्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहेत . त्यावर मागील वर्षी नगरपालिकेला निवेदन देऊनही कोणतीच ठोस उपाय योजना नगरपालिकेने केली नाही.दोन वर्षांपूर्वी घडलेल्या अतिवृष्टी ढगफुटीच्या घटनेत काही लोक मृत्यू पावले आहेत. नाल्यात साचलेल्या घाणीमुळे अनेक घरात नाल्याचे पाणी जाणे, विंचू, साप निघणे अश्या घटना एरवी घडत असतात. तसेच शहरातील धोका दायक इमारती यासंदर्भात उपाययोजना करून संबंधित चाळी,घरांना यासंदर्भात नोटीस बजावून होणाऱ्या अपघाताला आळा घालावा. मनसेतर्फे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अल्टिमेटम देत सर्व रस्त्यांची तात्काळ डागडुजी व्हावी तसेच शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करून शहरात कुठलाही अपघात घडू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा खराब रस्त्यांमुळे जर कोण्या नागरिकाला आपला जीव गमावा लागला तर संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असा इशारा याप्रसंगी मनसेचे अनिल हमदापुरे यांनी प्रशासनाला दिला . तसेच शहरातील नाली,नाल्यांची त्वरित साफसफाई करून सर्वसामान्य नागरिकांचे हाल होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन उभारण्यातील असा इशार मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे, शिवम नांदुरकर,लकी छांगणी, सोनू गुप्ता, सौरभ अनसिंगकर, तुषाल चोंडके यांनी या प्रसंगी दिला.