
संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष ,
अमीन शाह ,
साखरखेर्डा येथे गेल्या तीन दिवसां पासून वातावरण बदलला असून रिमझिम पाऊस पडत आहे त्यामुळे नेहमी प्रमाणे येथील विधुत पुरवठा दीर्घकाळ खंडीत होत आहे मंगळवारी तर रात्रभर विधुत पुरवठा बंद होता विधुत पुरवठा बंद असल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहे घरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्या मुळे अन बाहेर पाऊस असल्यामुळे कमालीचे त्रास सहन करावे लागत आहे विधुत पुरवठा खंडीत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसावे लागत आहे , इथे थोडं जरी वारा सुटला किंवा पाऊसा च्या चार धारा जरी पडल्या की घंटो येथील विधुत पुरवठा खंडीत होत आहे विधुत पुरवठा खंडीत झालं तर नेमका कोणाशी संपर्क साधावा येथील विधुत अभियंता कोण हे ही विधुत ग्राहकांना माहीत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काम सुरू असल्याचे सांगतात येथे शेंदुर्जन व मेहकर येथुन विधुत पुरवठा उपलब्ध आहे तरी ही नागरिकांना रात्रभर अंधारात काढावी लागत आहे विधुत पुरवठा वारंवार खंडीत का होतो या महत्वाच्या प्रशना कडे मात्र नव नियुक्त आमदार मनोज कायंदे स्थानिक लोकप्रतिनिधी ग्राम पंचायत प्रशासन गप्प आहेत त्यांनी या प्रमुख समस्ये कडे लक्ष केंद्रित करावे व येथील विधुत समस्या कायमची निकाली काढावी अशी मागणी गावातील सर्व सामान्य नागरिकांनी केली आहे ,












































