
खामगाव (प्रतिनिधी) : जळगांव खान्देश जिल्ह्यातील यावल येथील (तुबा नाज) टी.एन. हेल्प मल्टिपर्पज सोसायटीच्या वतीने रविवार 13 एप्रिल 2025 रोजी जळगाव येथील अल्पबचत भवन येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या समारंभात स्थानिक रहिवासी तथा दैनिक भास्कर खामगांव चे ब्युरो चीफ ईश्वरसिंह धनसिंह ठाकूर यांना माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम आदर्श युवा पत्रकार पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
ईश्वरसिंह ठाकूर हे मागील 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून ते विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. सन 2016 साली आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांना कोचिंग क्लासेस द्वारे मोफत शिकवणी तथा पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात सहकार्य केले. ज्यामध्ये इयत्ता 11, 12 वीत शिक्षण घेत असलेल्या सायन्स, आर्ट्स तथा कॉमर्सचे सुमारे 92 विद्यार्थांचा समावेश होता. यासह विविध माध्यमातून नेहमी गरीब व होतकरू मुलांना मदद करीत असतात. याअगोदर ईश्वरसिंह ठाकूर यांना पुणे, चंद्रपूर, गडचिरोली, संभाजीनगर, जळगाव खान्देश, शिर्डी इत्यादी ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याची दखल घेत टी. एन. मल्टिपर्पज सोसायटी यावल, जि.जळगाव च्यावतीने त्यांना युवा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.
ते आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देतात. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल ईश्वरसिंह ठाकूर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.












































