
५९,२७,५००/- रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ५ आरोपींवर गुन्हा दाखल ,
साखरखेर्डा जिला , बुलडाणा
बालाजी अर्बन को-ऑफरेटिव्य क्रेडिट सोसायटी चिखली शाखा साखरखेर्डा येथील शाखेतून बनावट सोने तारण ठेऊन कर्ज घेतल्याचे उघडकीस येताच मुख्य व्यवस्थापक यांच्या तंक्रारीवरुन साखरखेर्डा पोलीसांनी ११ मार्च रोजी पाच आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे
बालाजी अर्बन
नकली सोने गहाण ठेवून येथील बालाजी अर्बन को-ऑपरेटिव्य क्रेडिट सोसायटी पतसंस्थेची एकुण ₹. ५९,२७,५००/- रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील ५ आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्था मधील हित संबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ०३ सह भारतील न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे
थील आरोपींवर महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थासंबंधाने संरक्षण अधिनियम १९९९ चेभारतील न्याय संहितेच्या विविध कलमान्वये करण्यात आलीअसून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटना दिनांक १६/०७/२०२४ चे १०.०० वा ते १३/०२/२०२५ चे १८.०० वाजे दरम्यानची आहे. याबाबत फिर्यादी अनिल केशवराव गाडे, वय ४८ वर्ष , व्यवसाय – नोकरी जनरल मॅनेजर बालाजी अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लिमीटेड, चिखली, रा. राऊतवाडी फुलझाडे यांचे चक्कीजवळ चिखली, जिल्हा बुलडाणा यांनी येथील पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) अजिंक्य दिलीप शहाणे सोनार यांच्यासह, वय ३८ वर्ष, मु. पो साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा, जि. बुलडाणा२) राजु प्रभाकर केंधळे १८ लाख ४० हजार ५००, वय ४५ वर्ष, मु. पो सवडद, ता. सिंदखेड राजा,
३) भगवान सुभाष शहाणे १५ लाख १८ हजार, वय ३९ वर्ष, मु. पो
साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा
४) प्रदिप नामदेव आवचार- ६ लाख ५० हजार, वय ४५ वर्ष, मु. पो
साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा
५) गोपाल रंगनाथ पाझडे १९ लाख १९ हजार, वय ३८ वर्ष, मु. पो. साखरखेर्डा, ता. सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा या पाच खातेदारांनी बालाजी अर्बन को- ऑफ क्रेडिट सोसायटी, शाखा साखरखेर्डा शाखेत नकली सोने तारण ठेवून कोट्यावधीचा कर्ज घोटाळा झाला असल्याची बाब समोर आली होती. याबाबत बालाजी अर्बन च्या अधिकाऱ्यांनी येथील साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये ता. १४ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. सदर प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी पोलिसांनी तक्रार चौकशीवर ठेवली होती. पोलिसांनी बँक प्रशासनास अशा प्रकारची फसवणूकीची आणखी काही गैरप्रकार आहेत कां यांचा शोध घेण्यास सांगितले तक्रार चौकशी वर
ठेवून वरिष्टांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार येईल
असे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सांगितले होते.
साखरखेर्डा येथे बालाजी अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चिखली यांची एक शाखा आहे. ही पतसंस्था अल्प व्याज दराने किरकोळ व्यापारी, लहान व्यापारी यांना कर्ज देते. तसेच सोने तारणावर सुध्दा कर्ज देते.
. बँकेच्या प्रशासनाने २०१९ साली किंवा त्या अगोदर साखरखेर्डा येथील दिलीप शहाणे यांच्या सोबत करारनामा करून त्यांना सोने मुल्यांकन म्हणून नियुक्त केले होते.मात्र दिलीप शहाणे यांचा मृत्यू झाल्या मुळे त्यांच्या मुलास नियुक्त करण्यात आले होते मात्र या सोनाराने सोने शुध्दतेचे मुल्यांकन करून किमान २५ ते ३० व्यापाऱ्यांनी सोने तारण कर्ज उचलले असल्याचे कळते. काही कर्जदार व्यापाऱ्यांना याबाबत कुणकूण लागताच आणि सोसायटीने वसूली नोटीस बजावताच आपली व्यापारी प्रतिष्ठा खराब होऊ नये म्हणून काही कर्जदारांनी सोने तारण कर्ज भरणा केला. कर्जाचा भरणा केल्यानंतर बँक मॅनेजर यांनी बँकेमधे ठेवलेले गहाण सोने ग्राहकांना परत केले तेव्हा सदर सोने हे नकली असल्याचे निदर्शनास आले
ज्यांची स्वतः ची कोणतीही ऐपत नाही, स्वतःचे घर नाही, बायको नाही अशा लोकांच्या नावे ५० लाख ते एक कोटी रुपयांच्या घरात सोने तारण कर्ज घेतल्याचे सोसायटीच्या लक्षात यायला पाहिजे होते. नेमकं सोनं खरे की खोटे याची योग्य पडताळणी करायला पाहिजे होती. या गैरप्रकारात कर्जदार, सोनार आणि आणखी कोण कोण सामील आहेत ही बाब चौकशी अंती समोर येणार आहे.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी
त्या सर्व कर्जदार, व्यापारी आणि व्यक्ती व सोनार यांच्या नावाने साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. या कर्जदारांनी कर्ज थकविल्याने बँकेचे अधिकारी कर्जदारांकडे वसूली साठी जावू लागले तेव्हा कर्जदार कर्ज भरण्यासाठी टाळाटाळ करू लागले. जेव्हा थकीत कर्जदारांकडे वसूली साठी अधिकारी गेले तेव्हा सोसायटीची फसवणूक झाली असल्याचे बँकेच्या लक्षात येताच त्यांनी येथील पोलिस स्टेशन मध्ये धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी नकली सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे त्यांचे धाबे दणाणले होते. आता हे नकली सोने गहाण प्रकरण आणखी कोणते वळण घेते आणि यात आणखी कोण कोण आहेत याकडे साखरखेर्डा सह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे नकली सोने तारण प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी पोलीसांनी बि एन एस कलम ३१८ (४), ३३८, ३३६ (३) तसेच महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड व त्यांचे सहकारी करीत आहेत.












































