Home यवतमाळ समतापर्व प्रतिष्ठान तर्फे महिला दिन साजरा….

समतापर्व प्रतिष्ठान तर्फे महिला दिन साजरा….

164

यवतमाळ ( प्रतिनिधी ) – क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ आयोजित समता पर्व 2025 च्या महिला आयोजन नियोजन समितीतर्फे दिनांक 10 मार्च क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथि निमित्त महिला दिन स्थानिक विश्राम भवन या ठिकाणी साजरा करण्यात आली.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्य अध्यक्षा प्रमोदिनी रामटेके तसेच समतापर्व 2025 च्या मुख्य आयोजिका माधुरी वाळके व प्रवक्ता ऍड. सीमा तेलंग यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी 10 मार्च हा महिला दिन म्हणूनच साजरा करावा असे प्रतिपादन सुद्धा यावेळी महिला भगिनींच्या वतीने करण्यात आले विशेष म्हणजे यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती विविध महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही आज ज्या उभ्या आहोत त्याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना दिले जाते, त्यामुळे समाजातल्या प्रत्येक घरादारांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी व्हायला पाहिजे असेही यावेळी प्रवक्त्या ऍड.सीमा तेलंग यांनी सांगितले. यावेळी या प्रसंगी माधुरी वाळके, एडवोकेट सीमा तेलंगे, एडवोकेट वैशाली हिरे, स्नेहा डोंगरे ,पल्लवी रामटेके, नंदकिशोर निमगडे, हेमंत कांबळे, एड.रामदास राऊत ,नारायण थूल ,जनार्दन मनवर, विनोद पत्रे, प्रतिभा दातार इत्यादींची उपस्थिती होती.