Home बुलडाणा साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणुकी वर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर ,

साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणुकी वर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर ,

120

साखरखेर्डा येथे गणपती विसर्जन मिरवणुकी वर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर ,

पोलीस प्रशासनाची जययत तय्यारी ,

अमीन शाह ,

साखरखेर्डा येथे उद्या सम्पन्न होणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने जययत तय्यारी केली असून गणपती विसर्जन मिरवणुकी वर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुक मार्गावर 12 सीसीटीव्ही केमेरे लावण्यात आले असून यात जामा मस्जिद चौक 5 गुजरी चौक 5 गणपती चौक 2 केमेरे लावण्यात आले असून यात 2 सोलर स्वयंचलित केमेरे ही लावण्यात आले असून येथे प्रथमच उडत्या ड्रोन केमेऱ्या व्दारे गणपती विसर्जन मिरवणुकी चे चित्रीकरण करण्यात येणार आहे उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुकी साठी येथे उपविभागीय पोलीस अधिकारी ,दोन पी आय , तीन पी एस आय 40 पोलीस कर्मचारी , 45 होम गार्ड ,तसेच दंगा काबू पथक चे जवान तैनात राहणार असून गणपती विसर्जन मिरवणुकीत सर्व गणेश भक्तांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे गणेश उत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने येथील ठाणेदार गजानन करेवाड यांनी केले आहे ,