Home महत्वाची बातमी साखरखेर्डा येथे ईद मिलादुन्नुबी उत्साहात साजरी ,

साखरखेर्डा येथे ईद मिलादुन्नुबी उत्साहात साजरी ,

141

 

अमीन शाह
साखरखेर्डा , येथे आज मोठ्या जल्लोषात ईद मिलाद नबी उत्सव साजरा करण्यात आला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्यने सहभागी झाले होते पत्ता पत्ता फुल फुल या रसूल या रसूल हुजूर का दामन नही छ़ोडेंगे आदी उदघोषणा देण्यात आल्या या वर्षी अत्यन्त आनंदायी वातावरणात डी जे विना मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नात व सलाम पठण करत युवक सहभागी झाले होते ठीक ठिकाणी अल्पोहार चा बंदोबस्त करण्यात आला होता , येथील सरपंच सुनील जगताप त्यांचे बंधू विजय जगताप , संजय जगताप , विकी जगताप यांनी फटाके फोडून मिरवणूकिवर फुलांचा वर्षाव केला मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तसेच जामा मस्जिद जवळ वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सचिव विशाल गवई ,माजी उप सरपंच पत्रकार दर्शन गवई , ग्राम पंचायत सदस्य देवानंद खंडागले , तुषार बोरकर आदींनी पुष्पवृष्टी केली माजी जी प , सदस्य राम जाधव , पुत्र अमित जाधव यांनी ही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आनंदायी वातावरणात शांततेत संपन्न झालेल्या मिरवणूकित सर्व मस्जिद चे मौलाना सहभागी झाले होते , गुजरी चौक , जाफराबाद म्होल्ला , बस स्टँड बाजार गल्ली , जामा मस्जिद चौक , तांबोळी पुरा येथून हा जुलूस काढण्यात आला छोटी मस्जिद येथे फातेहखानी होऊन मिरवणुकीचा समापन करण्यात आला आज निघालेल्या मिरवणुकीत येथील ठाणेदार गजानन करेवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

 

13 वर्षा पासून परंपरा ,

ख्वाजा गरीब नवाज ज्युनियर कॉलेज , सैनिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष मेजर अर्जुन गवई यांच्या वतीने दर वर्षी मिरवणूकित सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना अल्पोहार चे वाटप करून स्वागत केले जाते आज ही ख्वाजा गरीब नवाज ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य समीर शेख , माजी सरपंच कमलाकर गवई , महादू गवई , यांनी सर्व मुस्लिम बांधवांचे स्वागत करून त्यांना अल्पोहाराचे वितरण केले , मेजर अर्जुन गवई यांच्या संकल्पनेतून गेल्या 13 वर्षा पासून ही परंपरा सुरू आहे ,