Home बुलडाणा मनोज पाटील जरांगे यांचा देऊळगाव राजा येथे धावता दौरा.

मनोज पाटील जरांगे यांचा देऊळगाव राजा येथे धावता दौरा.

121

पप्रतिनिधी:-रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:-जरांगे पाटील हे देऊळगाव राजा शहरातून पुढे चालले असता सकल मराठा समाज बांधवांनी त्यांना देऊळगाव राजा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही मिनिटासाठी थांबवण्यात आले तथे त्यांचा छोटा खाणि कार्यक्रम ठेवला असता तेथे मनोज जरांगे पाटील येताच हजारोंच्या संख्येने मराठी बांधव काही मिनिटातच गोळा होऊन मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून काही मिनिटासाठी त्यांनी मराठी समाजाला मार्गदर्शन केले त्यांनी यावेळेस सरकारने आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं जास्त वळवळ करायची नाही एका महिन्याचा वेळ दिला होता आता फक्त चार दिवस बोनस म्हणून शिल्लक आहे येथे 14 तारखेला घरी राहायचे नाही सगळ्यांनी अंतरवालीत यायचे तुमच्यामुळे समाजाचे कल्याण होथईल आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही आपल्यात एकजूट आहे फुटू देऊ नका असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सर्वांना येत्या 14 तारखेला अंतरवाली येथे लाखोच्या संख्येने येण्याचे आवाहन केले.