Home बुलडाणा साखरखेर्डा येथील ठाणेदार नंदकिशोर काळे सन्मानित ,

साखरखेर्डा येथील ठाणेदार नंदकिशोर काळे सन्मानित ,

155

 

 

विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांनी केला सम्मान ,

 

अमीन शाह
बुलडाणा ,

येथे आयोजित एका कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना सम्मानित करण्यात आले यात साखरखेर्डा येथील कर्तव्यदक्ष ठाणेदार नंदकिशोर काळे यांना सम्मानित करण्यात आले साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या सवडद या गावी गेल्या महिन्यात वडगावमाळी येथील केशव विठोबा भुतेकर याचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता खून केल्या नंतर आरोपी हे कोणताही पुरावा मागे न ठेवता पळून गेले होते मात्र या प्रकरणाचा योग्य तपास करून साखरखेर्डा पोलिसांनी काही तासातच या खून प्रकरणातील आरोपींना गजाआड केले होते , या कामगिरी साठी येथील ठाणेदार नंदकिशोर काळे व त्यांचे सहकारी यांना बुलडाणा येथे आयोजित एका कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक जयंतराव नाईकनवरे , जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने तथा सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते , साखरखेर्डा पोलिसांना हा सम्मान मिळाल्या मुळे आनंदाचे वातावरण पसरले आहे ,