
8लाख 76 हजार रुपयांच्या प्रतिबंधित गुटख्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त ,
अमीन शाह
बुलडाणा ,
चिखली पोलिसांनी दिनांक २४ ऑगस्ट च्या रात्री अडीच वाजता एका संशयित गाडीमधून तब्बल ८ लाख ७६ हजार १२० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून एकास अटक सुद्धा केली आहे. यावेळी पोलिसांनी गुटखा मिळून आलेले वाहन सुद्धा ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २४ ऑगष्ट च्या रात्री अडीच वाजता ठाणेदार संग्राम पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून रात्री अडीच वाजता पो.उप.नि. शरद भागवतकर, पो. हवा. राजकुमार खेडेकर, पोकॉ विनोद ब्राह्मणे चिखली येथील संभाजी नगर कमान जवळ संशयित वाहन चेक करत असतांना जाफ्राबाद च्या दिशेने जाणारी एक बोलेरो पीक अप एमएच २८ बीबी २०६९ संशयास्पद वाटत असल्यावरून पोलिसांनी सदर वाहनास थांबवून वाहन चालकास
विचारपुस करून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये खाकी रंगाचे १२ मोठे बॉक्स, १२ लहान बॉक्स तसेच ०६ खाकी व ०६ निळ्या रंगाच्या पोते ज्यामध्ये महाराष्ट्र केली आहे. शासनाने प्रतिबंधित केलेल्या विमल पान मसाला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ किंमत ८,७६, १२०/- रुपयांचा माल व गुन्ह्यात वापरलेली बोलेरो पीक अप की. अंदाजे ७ लाख रुपये असा एकूण १५ लाख ७६ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सौरव अशोक अतकरे रा. खामगाव याचे विरुद्ध अप क्र. ५८३/२०२३ कलम
३२८, १८८, २७३ भा. दं. वि. सह कलम २६ (२) (iv), ५ (i) अन्न सुरक्षा व माणके अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस अटक
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संग्राम पाटील यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. शरद भागवतकर, पो. हवा. राजकुमार खेडेकर, पो. कॉ. रोहिदास पंढरे, पोकॉ विनोद ब्राम्हणे, चालक पोहवा प्रमोद हुसे यांचे पथकाने केली असून पुढील तपास पो.उप.नि. शरद भागवतकर हे करीत आहेत












































