Home बुलडाणा सावडण्यासाठी जात असलेले पती पत्नी टिप्पर च्या धडकेत ठार ,

सावडण्यासाठी जात असलेले पती पत्नी टिप्पर च्या धडकेत ठार ,

119
बुलडाणा ,
      भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार पती पत्नीचा जागीचं मृत्यू झाल्याची घटना 3 जुलै 2023 च्या सकाळी 9 वाजे दरम्यान मेहकर तालुक्यातील जानेफळ- लोणी गवळी रस्त्यावरील लावणा येथे घडली.
    प्राप्त माहितीनुसार अधिक वृत्त असे की, देविदास भिवसन पवार 50, पत्नी इंदूबाई देविदास पवार 44 यांच्या सोबत दुचाकीवरून एका नातेवाईकाच्या सावडण्याच्या कार्यक्रमासाठी विश्वी येथे जात होते. दरम्यान जानेफळ – लोणीगवळी रस्त्यावरील लावणा गावाजवळ मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात एव्हढा भीषण होता की दोघा पती-पत्नीचा जागीचं मृत्यू झाला. घटनेनंतर टिप्पर चालकाने तेथून पलायन केले. मात्र संतप्त नागरिकांनी टिप्पर फोडून रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताचं डोणगांव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत टिप्पर ताब्यात घेतले असून, घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही प्रेतांना शव विच्छेदनासाठी मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे. अधिक तपास डोणगांव पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page