घाटंजी तालुक्यातील पारवा येथे खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या कागदपत्राच्या आधारे खोटे करारनामे करुन खोटे खरेदी खत नोंदवुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी..!
➡️ सामाजिक कार्यकर्ते संतोष गंगाधर दवने यांची पारवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार..!
( विनोद पत्रे ) ————– घाटंजी – घाटंजी तालुक्यातील पारवा येथील योगेश देशमुख, शिल्पा घावडे, प्रदीप उत्तरवार, दर्शन मानगांवकर, अशोक तुम्मलवार, पारवा ग्रामपंचायतचे सचिव, पारवा ग्रामपंचायतचे सरपंच व घाटंजी येथील दुय्यम निबंधक आदींनी कट रचुन, खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या कागदपत्राच्या आधारे खोटे करारनामे करने, तसेच रेव्हेन्यू व शासकीय रेकार्डला कोणतीही नोंद नसतांना खोट्या कागदपत्राच्या आधारे खोटे खरेदी खत नोंदविणे व त्या आधारे शासकीय जमिनीचे ले आउट नसतांना ग्रामपंचायत कार्यालयातील रेकार्डला खोट्या नोंदी घेऊन शासकीय जमिनीचे तुकडे पाडुन ती हडपने व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी वरील आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान 415, 420, 464, 465, 469, 470, 120 (ब) अंतर्गत कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याची मागणी पारवा येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष गंगाधर दवने यांनी पारवा पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच सदर प्रकरणाची तक्रार यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांचे कडे सुद्धा रजिस्टर पोष्टाने केली आहे.
विशेष म्हणजे तक्रारदार संतोष गंगाधर दवने यांनी सदर तक्रारी बाबत नोटरी पब्लिक प्रतिज्ञापत्र सुद्धा तयार केले आहे, हे येथे उल्लेखनीय.
पारवा ग्रामपंचायत अंतर्गत गावाला लागूनच शासकीय जमीन शेत सर्वे / गट क्रमांक 144 असुन त्याचे क्षेत्रफळ 4 हेक्टर 08 आर “एफ वर्ग” शेतजमिन आहे. त्या मध्ये 1 हेक्टर 97 आर ही शेतजमिन वसंत जिनिंगची असुन 2 हेक्टर 11 आर ही शेतजमिन सरकारची आहे. या बाबत 7/12 उतारयावर नोंदी आहे.
परंतु योगेश पारवेकर हा सदर शेतजमिनीचे तुकडे पाडुन आरोपी शिल्पा घावडे, प्रदीप उत्तरवार, दर्शन मानगांवकर, अशोक तुम्मलवार तसेच अनेक व्यक्ती पासुन बनावट करारनामे लिहून त्याच्या खोट्या खरीदया दुय्यम निबंधक घाटंजी यांचे समक्ष त्यांचे सोबत हात मिळवणी करुन खरीदया नोंदवुन घेत आहे. तसेच याला पारवा ग्रामपंचायतचे सरपंच व सचिव ग्रामपंचायत कार्यालयात खोट्या नोंदी घेऊन सहकार्य करित आहे.
शासकीय जमीन शेत भुमापन क्रमांक 144 एकुन क्षेत्रफळ 4 हेक्टर 08 आर ही “एफ वर्ग” शेतजमीन आहे. असे असतांना आरोपी क्रमांक 1 योगेश पारवेकर हा आरोपी क्रमांक 2 ते 8 यांचे सोबत कट रचुन खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या कागदपत्राच्या आधारे खोटे करारनामे करुन त्या बाबत रेव्हेन्यू व शासकीय रेकार्डला नोंद नसतांना खोट्या कागदपत्राच्या आधारे खोटे खरेदी खत नोंदविणे व त्या आधारे शासकीय जमिनीचे ले आउट नसतांना ग्रामपंचायत कार्यालयातील रेकार्डला खोट्या नोंदी घेऊन शासकीय जमिनीचे तुकडे पाडुन ती हडपत असुन शासनाची फसवणूक करीत आहे.
तक्रारदार संतोष दवने याने पारवा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सचिव यांना माहितीचा अधिकार कायदा अंतर्गत माहिती मागितली असता माहिती पुरविण्यात आलेली नाही. मात्र, नंतर कालांतराने कागदपत्रे पुरविली असल्याचे लेखी तक्रारीत नमुद आहे.
तरी पारवा व घाटंजी येथील आठही आरोपी विरुद्ध तात्काळ गुन्हे नोंदवुन अटक करण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार पारवा येथील संतोष गंगाधर दवने यांनी प्रतिज्ञालेखाद्वारे केली आहे.