Home यवतमाळ घाटंजी येथील तहसीलदारांनी महसुल पथकासह रेतीचा ट्रॅक्टर पकडला..!

घाटंजी येथील तहसीलदारांनी महसुल पथकासह रेतीचा ट्रॅक्टर पकडला..!

93

(अयनुद्दीन सोलंकी)

————————
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील घाटंजी ते मानोली रस्त्यावर घाटंजी तहसीलदाराचे पथक सकाळी 10 वाजता जात असतांना मानोली जवळ एक ट्रक्टर अवैद्यरित्या रेती वाहतूक करत असतांना आढळला. सदर ट्रक्टर वर महसुल विभागाला गाडी नंबर दिसुन आला नाही. सदर ट्रक्टर घाटंजी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे.

महसुल विभागाने सदर ट्रक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदर ट्रक्टर चालकाने रेतीने भरलेला ट्रॅक्टर पळविण्याच्या उद्देशाने मानोली येथील अमराई मधुन नगर परिषदेच्या गार्डन पर्यंत पाठलाग केला असता सदर ट्रक्टर चालकाने व मालकाने संगणमत करुन ट्रक्टर ट्राॅली मधील रेती खाली करण्याच्या नादात जाणुन बुजुन पल्टी केला. रेतीच्या ट्रक्टर चा पाठलाग करणारे तहसीलदार मोहनिश शेलवटकर व तलाठी देवानंद किणाके यांचे वर हल्ला करण्याच्या उद्देशाने लोखंडी राॅड व धारदार दगडाचा धाक दाखवत राॅड मारण्याचा प्रयत्न करुन रेतीचा ट्रक्टर पल्टी करुन ट्रक्टर घेऊन चालक व मालक पसार झाले, अशी माहिती तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी दिली.

महसुल विभागाने सदर ट्रक्टरचा पंचनामा केला असता, तो ट्रक्टर रवि पांडे यांच्या मालकीचा असल्याचा पंचनामा केला आहे. सदरची कार्यवाही घाटंजीचे तहसीलदार मोहनिश शेलवटकर, तलाठी देवानंद किणाके, बिरमोल तायडे, नरेंद्र चवडे आदींनी केली आहे.
———————-
➡️ तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, ट्रक्टर चालकाचा गैरसमज झाला असल्याचे सांगून नंतर त्यांनीच सहकार्य करुन ट्रक्टर स्वतःच पोलीस ठाण्यात लावला आहे.

➡️ घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांनी सदर ट्रक्टर ताब्यात घेऊन तसे पत्र घाटंजी पोलीस ठाण्यात दिले आहे. सदर प्रकरणात तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांची लेखी तक्रार नसल्याने गुन्हा वगैरे नोंदविण्यात आलेला नाही.