
अमीन शाह ,
बुलडाणा ,
समृद्धी महामार्गावर अपघातात बळी गेलेल्या २५ पैकी २४ जणांवर आज बुलडाण्यातील संगम तलाव स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांचा आक्रोश, काळीज पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या आसमंत चिरून टाकत होत्या. मंत्री गिरीश महाजन, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासह उपस्थित साऱ्यांनीच आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दुपारी हा अंत्यविधी पार पडला.तर गुडीया ला स्थानिक कबरस्थान मध्ये सुपूर्द खाक दफन करण्यात आला ,

डोळ्यातून येणाऱ्या आसवांनी प्रत्येकाच्या भावनांची वाट मोकळी करून दिली होती. मंत्री गिरीश महाजन यांनाही या वेळी आपले आश्रू रोखता आले नाहीत. त्यांनी स्वतः सरण रचून दुर्देवी मृतकांना अखेरचा निरोप दिला. पुन्हा एकदा धगधगत्या अग्निज्वालांत हे मृतक पंचतत्वात विलीन झाले.

सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या पिंपळखुटानजीक समृद्धी महामार्गावर परवा रात्री खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. यापैकी २४ प्रवाशांच्या मृतदेहांवर आज दुपारी बुलढाणा येथील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमीत हिंदूरितीरिवाजाप्रमाणे सामूहिक
अंत्यसंस्कार करण्यात आले. जळून कोळसा झालेल्या आप्तजनांत माझे कोण हे ओळखताही येईना, दुर्देवी प्रसंगात सामूहिक अंत्यसंस्कारा च्या वेळी सर्व प्रवाशांच्या कुटुंबीयांनी फोडलेल्या टाहो हृदय पिळून टाकणारा होता ,
या वेळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह शेतकरी नेते रविकांत तुपकर, आ.. श्वेताताई महाले, आ. संजय गायकवाड, खा. रामदास तडस, खा. प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, माजी आ. विजयराज शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, डॉ. पाटील, तहसीलदार खंदारे, मुख्याधिकरी पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मृतकांचे कुटुंबीय व बुलढाणेकरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दुःखद संवेदना व्यक्त केल्या ,













































