Home बुलडाणा पाण्यासाठी समस्त गावकऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य घागर मोर्चा,

पाण्यासाठी समस्त गावकऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य घागर मोर्चा,

96

पाण्यासाठी समस्त गावकऱ्यांचा ग्रामपंचायत कार्यालयावर भव्य घागर मोर्चा

मोर्चात सहभागी चार ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे

बुुलडाणा ,

मलकापूर पांगरा येथील समस्त गावकऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला मागील चार महिन्यापासून मलकापूर वासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात पंधरा ते वीस दिवस एकेका वार्डात नळासाठी वाट पाहावी लागते तर दुसरीकडे ग्रामपंचायत संबंधितांच्या घरात मुबलक पाणी सोडल्या जात असल्याचा आरोप करत पाणि द्या पाणी द्या..नाहीतर खुर्च्या खाली करा असे निर्देशने घोषणा देण्यात आल्या आल्या ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतच्या विरोधात उभे राहिले आहे तर आज पाणी मोर्चात विविध टीव्ही चॅनल वाले सुद्धा हजर झाले होते मलकापूर पांगरा नळ योजनेसाठी दोन कोटी 90 लाख रुपये मिळाले असले तरी पिण्याच्या पाण्यासाठी मलकापूर पांगरा ग्रामवासियांना भटकंती करावी लागत आहे मुबलक पाणी असताना देखील इथे पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो महिलांनी पाणी मिळत नसल्याकारणाने ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता पाण्यासाठी सरपंच उपसरपंच यांना जाब विचारला असता काय करायचे ते करून घ्या असे हनीफ बागवान यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे या निवेदनावर लगबग 200 पेक्षा जास्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून ते निवेदन ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आले तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य समीना बी शेख निसार पटेल
किरण काकडे राजू साळवे साबीर खान पठाण या चार ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिलेत मलकापूर पांगरा येथील पाणी प्रश्न पेटला असून पाण्यासाठी इथे ग्राम पंचायत प्रशासनावर रोष वयकत केला जात आहे ,