
➡️ आर्णी – केळापूरचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी मोदी सरकारच्या पारदर्शक कामाबदल जनतेला केले अवगत.

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी – घाटंजी येथील सोनू मंगलम येथे नुकतेच मोदी @9 वर्षपूर्ती कार्यक्रम अंतर्गत घाटंजी तालुक्यातील विविध उपक्रमातील लाभार्थी यांना मिळालेल्या लाभ संदर्भात कार्यक्रम नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, आमदार डॉ. संदीप धूर्वे, विधानसभा प्रमुख रवी बेलुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन कोठारी, उप सभापती सचिन पारवेकर, माजी उप सभापती सुहास पारवेकर आदीं उपस्थित होते. तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उत्तराखंडच्या खासदार डॉ. कल्पना सैनी यांची मुख्य उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे मुख्य म्हणजे घाटंजी तालुक्यातील विविध शासकीय महीला लाभार्थी यांना खासदार कल्पना सैनी यांच्या शुभहस्ते लाभपत्र देउन सन्मानित करण्यात आले. शासनापासुन मिळालेल्या लाभाच्या संदर्भात आमदार डॉ. संदीप धूर्वे यांनी मोदी (भा .ज. पा) सरकारच्या पारदर्शक कार्याची व लाभार्थ्यांना मिळालेल्या विविध लाभाची विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना नगर परिषद घाटंजी येथील एकूण लाभार्थी 1409 वाटप निधी 10 कोटी 87 लाख, रमाई आवास योजना एकूण लाभार्थी संख्या 48 – 2 कोटी 40 लाख, पी. एम स्वनिधी एकूण लाभार्थी 360 वाटप निधी 32 लाख 80 हजार, घाटंजी नगर परिषद अंतर्गत शौचालय संख्या 3 कोटी 53 लाख 77 हजार , बचत गट 193 एकूण महिला लाभार्थी 1930 कर्ज वाटप 2 कोटी 14 लाख, ग्रामीण बचत गट 1380 लाभार्थी संख्या 510, 14 कोटी वाटप. एकात्मिक बालविकास बेबी केअर किट 89 वाटप तसेच पंचायत समिती घाटंजी वाटप पी. एम. आवास योजना 6874, वैयक्तिक शौचालय 31070, रा. आ. अ. जननी सुरक्षा 4651 लाभार्थी 34 लाख निधी, पी. एम. मृत वंदन योजना 3362 प्रती व्यक्ती 5 लाख, अन्नधान्य पुरवठा अंतोदय योजना 3567 कार्ड, प्राधान्य योजना 22431 कुटुंब , शेतकरी कार्ड 936 कुटुंब 150 प्रती महा, संजय गांधी निराधार योजना 3003, श्रावणबाळ योजना 4306, रा. कु. अ. योजना 693 या सोबतच कृषी विभाग पी. एम. सिंचन योजना 4445 निधि 4.50 कोटी, कृषी यांत्रिककरण योजना लाभार्थी 41 लाख, रा. बा. मो. 1.41 लाख,पीक विमा योजना 15445 – 14 कोटी 38 लाख, किसान सन्मान योजना लाभार्थी 24076, महिलांसाठी उज्वला गॅस योजना 11066 लाभार्थी – 1 कोटी 77 लाख 56 हजार ,पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 200 गावांमध्ये 100 कोटी निधी आणला. तसेच नगर परिषद अमृत योजना 50 कोटी ही सर्व प्रगतीची कामे 2014 ते 2023 या कालावधीत पारदर्शक व जनहितेशू भाजपा सरकारच्या काळात आम्ही आणली असे वक्तव्य, आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी केले.
या कार्यक्रमाला घाटंजी तालुक्यातील बहुसंख्य लाभार्थी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भाजपाचे घाटंजी तालुकाध्यक्ष सुरेश डहाके, भाजपाचे शहर अध्यक्ष बालु उर्फ राम खांडरे, सरचिटणीस नंदकिशोर डंभारे, अंकुश ठाकरे, देवानंद काळे, आमदार यांचे स्विय्य सहाय्यक दिलीप पवार, अक्षय अप्पनवार, पुंडलीक वाढई, प्रकाश खरतडे, बंडू कदम, चेतन जाधव, प्रमोद कदम, चंदू पाटील, भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष रिना धनरे, सुषमा खांडरे, योगिता पवार, सोनु वीरदंडे, निता हामंद, दुर्गा भिडकर, वर्षा गगंशेट्टीवार, सुरेखा चौधरी, लता ठाकरे, ललीता ठाकूर, अर्चना पुरमकार व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आदींनी अथक परिश्रम घेतले.












































