Home बुलडाणा समृद्धी महामार्गावर आणखी एका डिझेल चोरट्यास रंगेहाथ पकडले

समृद्धी महामार्गावर आणखी एका डिझेल चोरट्यास रंगेहाथ पकडले

120

दुसरबीड प्रतिनिधि गुलशेर शेख

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीच्या चोरांच्या मुस्क्या आवळन्यास महाराष्ट्र सुरक्षा जवानांना यश आले असून डिझेल चोरणाऱ्या एका चोरट्यास डिझेल चोरताना पकडल्याने डिझेल चोरट्यामध्ये मोठी दहशत पसरली असून त्या चोरट्यास पुढील कारवाईसाठी किनगाव राजा पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहे
याबाबत माहिती अशी की समृद्धी महामार्गावर डिझेलचा चोरी च्या घटना होत आहेत डिझेल चोरी रोखण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा जवानांनी विशेष मोहिम हा ती घेतली असून दिनांक 21 च्या रात्री महाराष्ट्र सुरक्षा जवान सु,पये, गोपाल डहाळके जवान उमेश नागरे जवान सचिन सनांन्से जवान जयकुमार राठोड हे नाईट पेट्रोलिंग गस्त मारत असतांना चायनल नं. 319 वर एक संशयास्पद
स्विफ्ट डिजायर कार व ईरटीका कार उभी दिसली त्या गाडीकडे जात असतांना ईरटीका गाडीने तेथुन पळ काढला , परंतु स्विफ्ट डिझायर गाडी क्र. MH 04 FR 0521 मधील अनिल संजय पवार वय : 23 रा. निरगुडी खुर्द तांडा ता.खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर यास पकडून त्याच्या गाडीतून सहा डिझेलच्या कॅन जप्त केल्या या घटनेची माहिती किनगाव राजा पोलिसांना देताच बीट जमादार राजू घोलप शिवाजी बारगजे ,अवसरमोल वाहन चालक पंढरी डोईफोडे यांनी घटनास्थळी येऊन डिझेल चोरट्या स ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत