Home बुलडाणा मोहाच्या फुलापासून गावरान दारूला गृह उद्योगाचा दर्जा द्यावा – मधुकर शिंगणे शेतकरी...

मोहाच्या फुलापासून गावरान दारूला गृह उद्योगाचा दर्जा द्यावा – मधुकर शिंगणे शेतकरी संघटना

202

दारूला परवानगी मग मोहाच्या हर्बल दारुला का नाही परवानगी

हाच व्यवसाय पुढे हर्बल दारू म्हणून नावारूपाला येवू शकतो

प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:- गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला शेती हा व्यवसाय करीत आहे. गेल्या दोन दशकात शेती उत्पादन खर्च हा १०पटीने वाढला असून उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नाही,म्हणून शेती हा व्यवसाय तोट्यात आहे.पूरक व्यवसाय म्हणून गायी,म्हशी,पाळून पहिल्या, पण त्यामध्ये सुद्धा शेणाच्या पलीकडे शेतकऱ्याला शिल्लक काहीच राहत नाही.त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोहाच्या फुलापासून बनणाऱ्या दारूला गृह उद्योगता देऊन परवानगी द्यावी. मोहाच्या फुलापासून दारू निर्मितीची प्रक्रिया आदिवासी पट्ट्यात,वडया वस्तीवर पूर्वीपासून केली जाते.आयुवैदामध्येही या फुलाला स्थान आहे. हा विषय अनाधी काळापासून दुर्लक्षित राहिला आहे.मोहाच्या फुलापासून दारू गळण्यात शासन मान्यता दिली तर ,हाच व्यवसाय पुढे हर्बल दारू म्हणून नावारूपास येवू शकते. परिणामी, शेतकऱ्यांना उंचावेल. त्यांच्या मुला-मुलींचे शिक्षण होऊ शकेल.तसेही आपल्या राज्यात दारूवर बंदी नाही.म्हणून शेतकरी म्हणून आम्हाला मोहाच्या फुलापासून दारू तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने गृह उद्योगाला परवानगी द्यावी.एव्हडे मात्र खरे