
साडेपाच लाख लूटले.
सुलतानपुरात पंपावरील दरोडा फसला ,
पोलीस तपास सुरू आरोपी सीसीटीव्हीत कैद
सिंदखेड राजा
भगवानराव साळवे
तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील पंकज भालेराव यांच्या श्रीयान पेट्रोल पंपावर रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान वॅगनार गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल पंपाच्या केबिनमध्ये घुसून आत झोपलेल्या पंपावरील कर्मचाऱ्यांना टामी आणि पान्याने जबर मारहाण करून केबिनमध्ये असलेले साडेपाच लाख रुपये लुटून नेल्याची घटना दि 21 नोव्हेंबर चे रात्री साडेनऊ वाजता घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळतात साखरखेर्डा, किनगाव राजा आणि बीबी पोलिस घटनास्थळी येऊन दाखल झाले यावेळी आरोपी दरोडा टाकताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून दारोडेखोराना पकडन्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी सुरू केली आहे. पोलीस दरोडेखोरांचा मागावर आहेत दरम्यान दरोडेखोरांनी मलकापूर पांग्रा येथे पेट्रोल पंप लुटल्यानंतर ते सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकत असताना तेथील कर्मचारी आणि दरोडेखोरात झटापट झाली कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करताच दरोडेखोर घटनास्थळीच गाडी सोडून पसार झाले या झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाल्याची माहिती आहे. तर दरोडेखोरांनी केलेले हल्ल्यात पंपावरील कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे
या घटने संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पांग्रा येथे बीबी रोडवर पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंप वर रात्री गजबज असताना साडेनऊ वाजे दरम्यान वॅगनार गाडी मधून चार दरोडेखोर आले आणि पेट्रोल न भरता सरळ केबिन जवळ आले त्यामुळे केबिनमधील असलेले कर्मचारी योगेश पिसे, आकाश चव्हाण ,धनंजय जगताप, विकास मोटे, हे पेट्रोल भरण्यासाठी गाडी आली आहे असे वाटल्याने ते उठले त्यावेळी दरोडेखोरांनी आत प्रवेश केला केबिनमध्ये येऊन या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर दरोडेखोरांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याला हातोडा मारून कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला त्याच वेळी ज्या ठिकाणी कॅश होती त्या केबिनच्या काचा फोडून तिथे असलेली सुमारे साडेपाच लाख रुपये रोख रक्कम लुटून नेली दरम्यान कर्मचाऱ्यांच्या जवळ असलेले चार मोबाईल फोनही दरोडेखोरांनी पळविले. दरोडेखोर गेल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाहेर येऊन मालकाला फोन लावला त्यानंतर घटनास्थळी गावकरी जमले व घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे, किनगाव राजा चे ठाणेदार युवराज राबडे आणि बीबी पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे
——
सुलतानपूर येथील पेट्रोल पंपावरील दरोडा फसला ,
दरम्यान मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सुलतानपूर येथे असलेल्या कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी प्रयत्न केला मात्र तेथील पंपावरील कर्मचारी आणि दरोडेखरांमध्ये झटापट झाली यावेळी एका कर्मचाऱ्याला दरोडेखोरांनी तिक्ष्ण हत्याराने वार केल्याची माहिती आहे. तर कर्मचाऱ्यांनी देखील दरोडेखोराशी प्रतिकार करताना त्यांची गाडी फोडली त्यामुळे स्टेरिंग जाम झाल्याने दरोडेखोर गाडी सोडून पसार झाले.
मलकापूर पांग्रा येथील पेट्रोल पंपावर रात्री दरोडा टाकणाऱ्या दरोडेखांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत लवकरच आरोपीला जेरबंद करण्यात येईल
-जितेंद्र आडोळे
ठाणेदार पो.स्टे साखरखेर्डा
—-
*पेट्रोल पंपावरील दहा लाख ची कॅश वाचली*
पेट्रोल पंपावर आलेली रोग दररोज बँकेत करण्यात जमा करण्यात येते मात्र लग्न असल्याने पंपाचे मालक पंकज भालेराव आणि त्यांचे भाऊ सचिन भालेराव हे लग्नासाठी बुलढाणा येथे गेले होते त्यामुळे त्यांनी दुपारी दहा लाखाची कॅश घरी नेली होती लग्नाला तिकडे उशीर झाल्यामुळे रात्री त्यांनी जमा झालेली रोख रक्कम घरी घेऊन गेले नाही ती पेट्रोल पंपावर वरच ठेवली नेमका याच वेळी दरोडेखोरांनी आपला डाव साधला व तेथे असलेले सुमारे साडेपाच लाख रुपये लुटून नेले.
Live video ,











































