Home यवतमाळ इंजापूर येथील श्रीराम स्कूल शाळा अवैध…..

इंजापूर येथील श्रीराम स्कूल शाळा अवैध…..

258

 

शिक्षणाधिकारी यांचे आदेश धडकले

नेर:- शहरातील जवळगाव रोडवर असलेली श्रीराम शाळा अवैध असून सदर शाळेवर गुन्हा दाखल करावा व विद्यार्थ्यांचे समायोजन करावे असे आदेश शिक्षणधीकारी डॉ. जयश्री राऊत यांनी जारी केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. नेर तालुक्यात मान्यता न घेता प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाकरीता ईंग्रजी माध्यमाची शाळा अवैध पणे सुरु झाल्याबाबत तक्रार झाली होती. त्या अनुषंगाने नेर येथील गटशिक्षणधीकारी मंगेश देशपांडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता श्रीराम स्कूल ऑफ स्कॉलर्स डिजीटल इंग्लीश मेडीयम स्कूल इंझापूर ता. नेर ही शाळा विना मान्यतेच्या अवैधरीत्या सुरु असल्याचे स्पष्ट झाले. सदर शाळेवर बालकांचा मोफत व शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नूसार मान्यतेशिवाय शाळा सुरु असल्याचे कलम १८ (५) नुसार कारवाई करण्याचे आदेश आज पारीत झाले. तसेच सदर शाळेतील विद्यार्थी इतर शाळेत समायोजीत करावे या कारवाईचा अहवाल त्वरीत सादर करण्याचे आदेशात नमुद आहे. या आदेशाने मान्यता नसतांनाही शाळा चालवणारात धास्तीचे वातावरण पसरले आहे. ही शाळा अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्याने आता विद्यार्थी वर्गासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या कारवाईला तब्बल सहा महीने कसे लागले यावर प्रश्न पडला आहे.