Home बुलडाणा वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.

वारकरी भवनाच्या भूमिपूजन सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे.

270

 

जिल्हाध्यक्ष दामुअण्णा महाराज शिंगणे

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव राजा:-उद्या दिनांक १३/१०/२०२२ रोज गुरुवार ला सकाळी नऊ वाजता जयस्तंभ चौक बुलढाणा या ठिकाणाहून वारकरी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी जिल्हा भरातील वारकरी महिला व पुरुष यांनी हजारोच्या
संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी जाहीर पत्रकाव्दारे केले आहे.
सविस्तर वृत्त असे की धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या कडून वारकऱ्यांच्या मागणीनुसार अडीच कोटी रुपयांच्या किमतीचे भव्य आणि दिव्य वारकरी भवन निर्माण होत आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा देशातल्या अनेक संत महात्म्याच्या हस्ते होत आहे वारकरी भवनाच्या भुमी पूजनाच्या मंगलमय सोहळ्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन दामुअण्णा महाराज शिंगणे यांनी केले आहे.