Home बुलडाणा माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रविदासांचा उपदेश – इंजि.डि.टि.शिपणे

माणुस आणि देशाच्या हितासाठीच संत रविदासांचा उपदेश – इंजि.डि.टि.शिपणे

588

 

बुलडाण्यात गुरु रविदास संदेश रथयात्रेचे जंगी स्वागत

बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे

आपआपसात, समाजासमाजात तेढ निर्माण होवू देवू नका असा अमुल्य संदेश देत,मतभेदामुळे समाज आणि देशाची अपरिमित हानी होत असल्याचे गुरु रविदास यांच्यां विचारधारेवरून दिसून येते. म्हणजेच, माणुस आणि देशाच्या हितासाठीच गुरु रविदासांचे उपदेश असल्याचे दिसून येते असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डि.टि.शिपणे यांनी गुरु रविदास संदेश रथ यात्रेचे स्वागत  प्रसंगी केले.

आज दि.6 मे 2022 रोजी  सकाळी अकोला जिल्ह्यातुन बुलडाणा येथे सामाजिक कार्यकर्त्ये अशोक लहाने व सहकारी यांनी गुरु रविदास यांचे विचार व साहित्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून व समाज प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात गुरु रविदास संदेश रथ यात्रेचे आयोजन केले आहे,त्या रथयात्रेचे सोळा जिल्ह्यातुन भ्रमण होऊन बुलडाणा जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी इंजि.डि टि शिपणे,अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश डोंगरे यांच्या नेतृत्त्वाखाली खामगाव,बुलडाणा येथील धाड नाका रविदास मंदिर , चिखली,देउळगाव राजा येथे रथयात्रेचे जंगी स्वागत केले,या प्रसंगी युवाप्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, राज्य उपाध्यक्ष इंजि.अशोक भोसले,के एम वैरी,भिमराव रिठे,धनराज पुरभे,पेंटर सुभाष पुरभे,बी एन तांदळे,श्रीकृष्ण वानरे,रामभाऊ काटकर,लताबाई लहाने,सुशिलाबाई ईरच्छे,छगन शिराळे,ग्रामपंचायत सदस्य सोनाली धनराज पुरभे,रमेश बिबे,सुभाष बीबे,इंजि.शिवाजी जोहरे,प्रमोद माळी, मदन बीबे यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते,

तर अशोक लहाने यांनी मन शुद्ध असेल तर कुठेही समाधान लाभते, पाणी मनाने कितीदाही अन् कोणत्याही नदीत स्रान केले तरी समाधान लाभत नाही, असा विचारच संत रविदासांचा होता.  ‘मन चंगा तो कठौती मे गंगा’ ही हींदी म्हणही संत रविदासांच्या वाणीतूनच आली आहे.  माणसाचे मन पवित्र असेल, त्याला जातीयवादाचा स्पर्श झाला नसेल तर चांभाराच्या कुंडातही त्याला गंगाजलाचे पावित्र्य दिसून येईल. चांभार हा देखील एक माणुसच आहे, त्याला हिन ठरवू नका, पवित्र किंवा निखळ मनाने पाहिले तर कुंडातही गंगा दिसू शकेल, केवळ तशी दृष्टी जोपासायला पाहिजे, या विचारधारेतून संत रविदासांच्या विचारांची व्यापकता कळून येते असे मत मांडले,

तर प्रकाश डोंगरे म्हणाले की गुरु रविदास हे संत कबीरांचे गुरूबंधू होते. स्वामी रामानंद हे त्यांचे गुरू. रविदासांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजाला उपदेश केला. संत रविदासांच्या विचारांनी प्रेरीत होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘द अनटचेबल’ हा ग्रंथ गुरु रविदासांच्या चरणी अर्पण केला आहे.  सतमार्गावरून चालण्यासाठी केलेला त्यांचा उपदेश आजही अंगीकारण्यासारखा आहे. विशेष म्हणजे त्यांच्या भक्तीसाहित्यात नेहमीच्या बोलीतले शब्द होते. त्यामुळे त्यांचे साहित्य लोकांना भावले.

   जात-पात- श्रध्दा-अंधश्रद्धा नव्हे तर, एकजूट आणि धर्म आणि देशप्रेमाबाबतही संत रविदासांनी अतिशय रोकठोक विचार प्रकट केलेत. 

‘हिल,मिल चलो जगतमे, फूट पडो दो नही, फूट पडी माची तो, देश नष्ट हो जाई’  अर्थातच, एकजुटीला संत रविदासांच्या दृष्टीकोनातून अनन्यसाधारण महत्व असल्याचे डोंगरे यांनी सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम बोर्डे तर आभार प्रमोद माळी यांनी मानले,यशस्वीतेसाठी भास्कर चांदोरे,बबनराव कुमठे,डॉ. सुभाष डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले