
रविन्द्र साखरे
वर्धा – तळेगाव शा पंत तळेगाव नजीकच्या चिस्तूर या गावात दिनांक 24 एप्रिल ला मडघे यांच्या शेतात गावातीलच रमेश नारायण वावरे वय 65 वर्ष यांचा मृतदेह सापडला होता, विशेष म्हणजे या मृतदेहाबाबत मिसिंग ची तक्रार त्याच दिवशी मृतकाच्या मुलीने तळेगाव पोलीस ठाण्याला दिली होती, सुरुवातीला ह्या प्रकरणाचा तपास करताना कोणतेही पुरावे हाती नव्हते. त्यामुळे मृतदेहबाबत पोलिसांना काहीशी सशंका होती तपास करून अवघ्या काही दिवसात खुणाचा भयानक प्रकार उघडकीस आणत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या अतुलनीय कामगिरीमुळे तळेगाव पोलिसांच्या शिरपेचात मनाचा तुरा हुसेन शहा यांच्या अथक प्रयत्नमुळे रोवल्या गेला आहे. यातील आरोपी ध्रुवपाल मारोतराव सरॊदे वय 35वर्ष रा चिस्तूर, निलेश रमेश चौधरी वय 30 वर्ष रा चिस्तूर, सुरेश व्यंकट चौधरी वय 60 वर्ष रा चिस्तूर यांचे मृतकसोबत गेल्या एक दोन वर्षांपासून शेती संबंधाणे वाद होते. मृतक हे गावठी आयुर्वेदिक औषधी देऊन बिमारी ठीक करायचा.त्यातच आरोपीच्या बकऱ्या मरण पावल्याने त्या बकऱ्या मृतकनेच मारल्या असाव्यात असा आरोपीचा समज झाला, आणि यातूनच मृतकाला कायमचा धडा शिकवायचा असा कट या तीनही आरोपीनी निलेश चौधरी याचे शेतात रचला. मृतक यांच्या कडे म्हशी व दूध देणारे जणावरे असल्याने त्यांच्या साठी चारा आणायला मृतक हे नेहमी ज्या रस्त्याने जातं त्याच रस्त्यावर त्यांचा काटा काढायचा असे या कटात ठरले त्यानुसार त्यांनी मृतकाला सांगनमत करून संपविले, या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दहा ते बारा नागरिकांचे बयान नोंदविले, यामध्ये उलटातपासण्या सुद्धा करण्यात आल्या. मृतकाच्या मुलीने दिलेल्या फिर्यादमध्ये संशय व्यक्त केल्याने त्यांच्याच दिशेने पोलिसांनी आपला तपास सुरु ठेवला, यासाठी पोलिसांनी आपले खबरे गावात पेरून ठेवले आणि त्याच जाळ्यात आरोपी फसले, आरोपीनी दारूच्या नशेत मृतकाच्या पत्नीला टॉन्ट मारल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु ठेवत आरोपीना चौकशीची नोटीस बजावली दिलेल्या बायांनामध्ये तथ्य आधाळात नसल्याचे पाहून पोलिसांनी खाकी हिसक्या दाखवताच आरोपीनी खुणाची कबुली दिली, या घटनेतील तीनही आरोपीना पोलिसांनी अटक केली असून उद्या त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या सर्व घटनेमध्ये तळेगाव चे ठाणेदार आशीष गजभिये यांनी केलेल्या मार्गदर्शनातं पोलीस उपनिरीक्षक हुसेन शहा, मंगेश मिलखे यांनी केली.










































