Home बुलडाणा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांने बालाजी नगरीसाठी २.७७ कोटी मंजुर

पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांने बालाजी नगरीसाठी २.७७ कोटी मंजुर

376

 

राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे यांनी दिली माहिती

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगावराजा :-राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी बालाजी नगरीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तसेच शहरातील रस्ते उत्त्तम दर्जाचे करण्यासाठी विवध योजनेतून नगर पालिकेला निधी उपलब्ध करुन दली. त्यातील शहरातील विशेष रस्ता अनुदान येजना अंतर्गत नगर पालिकेला २.७७ कोटी रुपये मंजूर केले आहे. अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे यांनी दिली आहे. 
कोरोनाच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविणे ही महत्वाची जबाबदारी सरकार ची होती. त्यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करीत होता. त्यातून कोरोनाच्या काळात निधीची कमतरता निर्माण झाली होती. परन्तु निधीची कमतरता असली तरीही विकासकामे मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्हा पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी प्राधान्य देत शहराच्या विकासासाठी आतापर्यंत या अगोदर २ कोटी ५० लाख, १ कोटी ९० लाख आता २ कोटी ७७ लाख रूपये निधी उपलब्ध करून दिलं. या उपलब्ध निधितुन शहरात भूमिगत गटारींसह रस्त्याची रखडलेली कामे लवकरच पूर्ण करण्यात येईल. नुकतेच देऊळगावराजा शहरासाठी विविध विकास कामासाठी २.७७ कोटी रुपये मंजूर झाले आहे. शहरातील विविध प्रभागातील सिमेंट काँक्रीट रोड तयार करणे, पुलाचे बांधकाम करणे, असे विविध विकास कामांसाठी २ कोटी ७७ लक्ष रुपये निधी राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे उालब्ध करुन दिली. लवकर कामाला सुरुवात होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे यांनी पोलीस वाला न्यूज प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.