
सिंदखेडराजात तालुक्यात निराधारांना दरमहा 1 कोटी 26 लाख 66 हजार रुपयाचे होते अनुदान वाटप
भगवानराव साळवे
सिंदखेडराजा ,
राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांतर्गंत निराधार लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये वेतन दिले जाते. सिंदखेड राजात निराधारांना दरमहा 1 कोटी 26 लाख 66 हजार रुपयाचे अनुदानाचे वाटप होते मात्र, शासनाच्या या योजनांचा अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत असल्याचे अशा लाभार्थ्यांना चोप बसावा म्हणून अपात्र बोगस लाभार्थ्यांचा शोध घेण्याचे काम महसूल प्रशासनाने युद्ध पातळीवर सुरू केले असून, बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई करण्याचा थेट इशारा तहसीलदार सुनील सावंत यांनी दिल्यामुळे निराधार योजनेच्या नावाखाली लाभ घेणाऱ्या बोगस लाभार्थ्यांची धाबे दणाणले असून आता त्यांची खैर नाही.
राज्य शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना व केंद्र आणि राज्य शासनाकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविल्या जातात या योजनेंतर्गंत निराधार व्यक्तींना दरमहा एक हजारांचे वेतन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाते. तसेच घटस्फोटित, विधवा, दिव्यांग, अनाथ व परितक्त्या आदी लाभार्थ्यांनाही संजय गांधी निराधार योजनेंतर्गतच वेतन प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून थेट त्यांच्या बॅंकेच्या खात्यावरच जमा केली जाते या अनुदानामुळे निराधारांना मोठा आधार मिळतो. मात्र, अनेकजण बोगस लाभार्थी बनून शासनाची फसवणूक करत आहेत तसेच अनेक लाभार्थी मयत झाले असून त्यांच्या एटीएमच्या माध्यमातून बँकेमधून त्यांच्या खात्यातून पैसे काढत असलेल्या अनेक तक्रारी शासनाच्या निदर्शनास आले आहेत त्यामुळे महसूल विभाग तहसीलदारांनी बोगस लाभार्थी शोधण्यासाठी गाव पातळीवर तलाठ्यांना लाभार्थ्यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित तहसील प्रशासनातर्फे ग्रामसेवक व तलाठ्यांना या योजनेच्या प्रत्येक गावाच्या लाभार्थ्यांची याद्या पाठवून त्यामध्ये मयत कोण आहेत अपत्य संख्या मोठ्या आता त्याचे वय लाभार्थी विधवा परितक्त्या असेल तर पुनर्विवाह केला आहे काय कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन कुटुंबात नोकरी निवृत्तीवेतनधारक आहे का कुटुंबात शेती आहे का असल्यास किती शेती आहे कुटुंबाचे अंदाजित उत्पन्न लाभार्थी गावात राहतो का लाभार्थी मयत आहेका लाभार्थी अनुदान घेण्यास पात्र की अपात्र आहे याची चौकशी करण्याचे आदेश देऊन अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सांगण्यात आले आहे. जर बोगस लाभार्थ्यांना अनुदान वितरित झाल्यास याची जबाबदारी तलाठी यांची राहील अशा सक्त सूचना वजा क** इशारा तहसीलदार यांनी दिला असल्याने अनेक बोगस लाभार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत
***†************************************सिंदखेड राजात निराधारांना दरमहा 1 कोटी 26 लाख 66 हजार रुपयाचे होते अनुदान वाटप
शासनाने वृद्ध निराधार विधवा अपंग परितक्त्या आधी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी शासनाच्या वतीने श्रावण बाळ योजना संजय गांधी योजना इंदिरा गांधी योजना राबून त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा एक हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा करण्यात येतात सिंदखेड राजा तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे 3411 संजय गांधी योजनेचे 2962 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे 6161 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे 79 तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेचे 53 असे एकूण 12666 लाभार्थी संख्या आहे त्यानुसार थेट लाभार्थ्याच्या खात्यात दरमहा एक हजार रुपये प्रमाणे सिंदखेड राजा तालुक्यात दरमहा 1 कोटी 26 लाख 66 हजार रुपयांचे अनुदान या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येते, **†************************************* बोगस लाभार्थ्याची खैर नाही तहसीलदार सुनील सावंत
बोगस अपात्र लाभार्थी शोधण्या करिता प्रत्येक गावाची लाभार्थ्यांची यादी आणि तपासणी करण्याचे निकष तलाठी यांना देण्यात आले आहे यामध्ये शोध मोहीम मधून अपात्र असलेले लाभार्थी वगळण्यात येणार असून जे बोगस लाभार्थी मिळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा लाभार्थ्यांची खैर नसल्याचा थेट इशारा तहसीलदार सुनील सावंत यांनी दिला ,
एजंट मार्फत प्रकरण देऊ नका पैसे मागत असेल तर त्या दलालाची तक्रार करा
तुम्हाला लाभ मिळवून देतो म्हणून दलाल गावागावात फिरून अपात्र लाभार्थ्यांना भूलथापा देऊन निराधार लाभार्थ्यांकडून त्याचा गैरफायदा घेत पैसे उकळत आहेत तहसीलमध्ये प्रकरण मंजूर करण्यासाठी पैसे लागत नाहीत त्यामुळे लाभार्थ्यांनी दलाला पासून सावध राहावे जर कोणी दलाल लाभार्थी गुड पैसे मागत असेल तर त्यांच तक्रार करावी असे आवाहन संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार वराडे आणि संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष मोहम्मद यार खा यांनी आवाहन केले आहे











































