Home बुलडाणा नारी शक्ती पुरस्कार सुषमा राऊत यांना जाहीर

नारी शक्ती पुरस्कार सुषमा राऊत यांना जाहीर

176

 

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या व तेली समाजाच्या वतीने औरंगाबाद येथे पुरस्कार सोहळा

प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )

देऊळगा राजा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व तेली समाजाच्या वतीने समाजाला संघटीत करण्यासाठी व संघटनेमार्फत विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने जागतिक महिला दिनानिमित्त तेली समाज कर्तबगार महिलांना सन्मान नारी शक्तीचा हा पुरस्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महिला बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सुषमा राऊत यांना जाहीर करण्यात आलेला आहे.
गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदा ची जबाबदारी सुषमा राऊत संभाळत आहे त्यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक समाज उपक्रम तसेच एक महिला असून नुकतेच शेगाव येथे वधु वर परिचय मेळाव्याचे सुंदर आयोजन करून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले तसेच तेली समाजासाठी अनेक उपकरणे राबवली त्यांचे उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच यांच्या कार्याची प्रेरणा महिलांमध्ये जागृती निर्माण करणारी असल्याने जागतिक महिला दिनानिमित्त तेली समाज कर्तबगार महिला सन्मान नारी शक्तीचा हा पुरस्कार महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व तेली समाजाच्या वतीने दि.८ मार्च रोजी मान्यवारांच्या हस्ते देण्यात येणार आहे.