Home बुलडाणा काविळाच्या आजाराने तरुणांचा मृत्यू दोन मुली बापापासू झाला पोरखा छत्र हरवले

काविळाच्या आजाराने तरुणांचा मृत्यू दोन मुली बापापासू झाला पोरखा छत्र हरवले

341

गुंजाळा येथे घडली घटना

प्रतिनिधी: – [ रवि अण्णा जाधव ]
देऊळगाव राजा: – गुंजाळा येथील ३५ वर्षीय बद्रीप्रसाद नागरे हा काही महिन्यां पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता . त्यातून काहीसा बरा होत नाही तोच कावीळ आजाराचे लक्षणे आढळून आली .
कावीळ आजारावर दोन दिवसांपासून उपचार सुरू असतांना त्याची प्राण ज्योत माळविली . ही घटना गुंजाळा येथे ४ मार्च रोजी घडली .
चिखली तालुक्यातील गुंजाळा हे गाव शेवटच्या टोकावर आहे . या गावाची लोकसंख्या दिड ते दोन हजाराच्या जवळपास आहे . या गावात रहिवाशी असलेले हरिभाऊ नागरे यांना चार मुले असून सर्वात लहान मुलगा बद्रीप्रसाद नागरे वय ३५ वर्ष याने दे मही येथे मोटारसायकल दुरुस्तीचे दुकान टाकून त्याला दुकानांमध्ये भावाची मुले मदत करायची , पत्नी दे मही येथील सामान्य रुग्णालयात आरोग्य कर्मचारी म्हणून काम करीत असल्याने काही दिवस दे मही व काही दिवस गुंजाळा गावात राहत असे . मागील कोरोनाच्या काळामध्ये बद्रीप्रसाद नागरे हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असल्याने अनेक दिवस कोरोना आजार बरा होण्यासाठी महागड्या गोळ्या औषधी सुध्दा घेतली होती त्यामुळे तो अशक्त झाला होता . त्यातून तो बरा झाला परंतू त्याला पुन्हा पिवळ्या कावीळ आजाराची लागण झाली . पत्नी आरोग्य कर्मचारी असल्याने त्याच्यावर खाजगी तसेच मेडिकल औषधीचा उपचार सुरू होता . या काविळाच्या आजारातूनही बरा होवू लागला होता मात्र अचानक दोन दिवसांपूर्वी काविळाचे लक्षणे जास्त आढळून आल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविले तेथे उपचार सुरू असतांना त्याची प्राणज्योत मावळली . बद्रीप्रसाद नागरे याला दोन मुली असून एक पाच वर्षांची आणि दुसरी दोन वर्षांची असल्याने या मुलींवरील वडिलांचे छत्र हारविल्याने गुंजाळा वासीयावर शोककळा पसरली आहे .