Home विदर्भ अट्टल मोटार सायकल चोरास सेवाग्राम पोलीसांनी केली अटक

अट्टल मोटार सायकल चोरास सेवाग्राम पोलीसांनी केली अटक

296

इकबाल शेख – वर्धा

फिर्यादी नामे मेहमुद मुस्ताक शेख वय 33 वर्ष, रा. जुनि वस्ती सेवाग्राम यांनी हे कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे नोकरी करित असुन त्यानी दि. 03/03/2022 रोजी पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे तक्रार दिली की, ते त्याचे मालकीची हिरो प्लेंडर प्रो क्र. MH 32 AA 7320 ने नेहमी प्रमाणे ड्युटीवर गेले व मोसा स्टाफ पार्कींग येथे पार्क, करुन ड्युटीवर गेले ड्युटी संपल्यावर गाडी जवळ आले असता त्याना त्यांची मो.सा दिसुन आली नाही करिता त्याची हिरो प्लेंडर प्रो क्र. MH 32 AA 7320 किमंत 30,000/- रु ची कोणीतरी चोरुन नेल्याचे तक्रार वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल गुन्हे प्रकटीकरण पथकाने घेवून पो. स्टे. परिसरात गुप्त बातमीदार नेमुन गुप्त बातमीदाराकडुन मिळाले ल्या माहिती प्रमाने आरोपी नामे सुहास प्रभाकरराव मोरे वय 45 वर्ष रा बाभुळगाव (कोंगा) ता सेलू जि वर्धा यास अटक करुन त्याचे जवळुन गुन्ह्यात चोरलेले मो.सा. क्र. MH 32 AA 7320 किमंत 30,000/- रु जप्त करण्यात आली. तसेच आरोपीस सखोल विचारपूस केली असता आरोपीने पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीमधुन आणखी दोन गाड्या हिरो प्लेंडर क्र MH 32 AF 4291 कि. 30000/- रु ची तसेच MH 32 H 5808 कि 20,000/- रु ची चोरल्याची कबुली दिली तसेच आर्वी नाका परिसरातुन हिरो प्लेंडर क्र. MH 32 F 32 20 कि 20,000/- रु तसेच महिला आश्रम परिसरातुन होन्डा फँशन प्लस विना नंबरची बंद स्थितीतली ईंजिन क्र. 06A08M03842 कि. 10,000/- रु ची अशा एकुन 5 मोटार सायकल जप्ती करुन गुन्हे उघडकीस आणले तसेच आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे पोलीस स्टेशन सेवाग्राम याचे निर्देशाप्रमाणे पो. हवा. हरिदास काकड, नापोशि. गजानन कठाणे, जयेश डांगे, पोशि पवन झाडे अभय ईगळे नेमणुक पोलीस स्टेशन सेवाग्राम तसेच सायबर सेल चे निलेश कट्टोजवार यांनी केली.