Home परभणी शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

255

 

गंगाखेड /प्रतिनिधि
शेतीला दिवसा 10 तास वीजपुरवठा करावा या मागणीसाठी नांदेड रोड वरील इटारसी नदीच्या पूला जवळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी एक तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा दोन्ही बाजूने लागल्या होत्या.

शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी कोल्हापूर येथे उपोषणाला बसले आहेत .या उपोषणाला पाठिंबा म्हणून गंगाखेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी दुपारी तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव शिंदे, विधानसभा अध्यक्ष जयवंत कुंडगिर,तालुकाध्यक्ष बाळासाहेब टेकाळे आदींनी आपले विचार मांडले. परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर , मरडसगावचे जयदेवमिसे यांनी यावेळी स्वतःहून उपस्थित राहत शेतकऱ्याच्या मागण्यांना आपला पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. अंकुश कोरडे, भगवान मात्रे, बाळासाहेब मुलगिर, दिगंबर रेबाळे,माधव कुंडगिर, माधव खोकले, गणपतराव शिंदे, प्रकाशराव शिंदे, मारुतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे प्रकाश जोशी आदींनी सहभाग नोंदवला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.