Home बुलडाणा चोरट्यांनी सोयाबीन कट्टे केले लांमपास

चोरट्यांनी सोयाबीन कट्टे केले लांमपास

660

प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )

देऊळगाव मही: – राष्ट्रीय महामार्गालागून शेख अहेमद शेख बशीर यांची किसान ट्रेंड्स कंपनी आहे शनिवार रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास या किसान ट्रेड कंपनीतुन अज्ञात चोरांनी 50 क्विंटल सोयाबीन पसार केल्याची घटना घडली या घटनेचे सविस्तर वृत्त असे की

देऊळगावमही येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या शेख अहेमद शेख बशीर यांची किसान ट्रेंड्स कंपनी आहे या ठिकाणी ते सोयाबीन ईतर धान्याची खरेदी विक्री करतात मात्र अज्ञात चोरांनी वाढत्या थंडी फायदा घेऊन मागील बाजूस कंपनीचा पत्रा कापून आपल्या वाहनाने 50 क्विंटल सोयाबीन पसार केली असल्याने कंपनी मालकाचे अंदाजे तीन ते चार लाखाचे नुकसान झाले आहे गेल्या या घटनेची माहिती रविवार सकाळी सात वाजता विनोद शिंगणे यांनी कंपनी मालकाला दिली या घटनेची माहिती घटनास्थळी धाव जागेची पाहणी करून मिळताच पोलिस प्रशासनाने अज्ञात चोरा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गेल्या काही महिन्यांपासून देऊळगावमही परिसरात चोरीच्या घटना सातत्याने घडत आहे मात्र पोलीस प्रशासन घटनेचा तपास लावण्यासाठी सातत्याने अपयशी ठरत आहे.