Home विदर्भ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

410

प्रतिनिधी- प्रमोद झिले येरला,

हिंगणघाट / वर्धा – नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील येरला शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिली या भिषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला.मृत्यक दुचाकीस्वाराचे नाव चंद्रशेखर भोलाराम कुबडे, वय 62 वर्षे राहणार सावली वाघ असे आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रशेखर भोलाराम कुबडे, वय 62 वर्षे, राहणार सावली वाघ हे आपले दुचाकी क्रमांक एम. एच. 32 ए.एल. 2459 ने येरला शिवारात रोडचे विरूध्द दिशेने वडकी कडुन हिंगणघाट कडे येत असता अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवुन त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. या भिषण धडकेत दुचाकीस्वार चंद्रशेखर कुबडे हे गंभीर जख्मी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघाताची माहिती मेघशाम झिले राहणार येरला यांनी मृत्युंजय दुतला देताच पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, पोलिस कर्मचारी देवेंद्र पुरी, किशोर येळणे, गौरव खरवडे, सुनिल श्रीनाथे, निखील वाडकर,जोती राउत यांनी तात्काळ घटना स्थळ गाठुन मृत्युंजय दुताचे मदतीने मृतक यांस ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे दाखल केले. या अपघाची नोंद वडनेर पोलिस ठाण्यात करण्यात आली असुन पुढील तपास पो. स्टे वडनेर करीत आहे. सदरची कार्यवाही प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांचे मार्गदर्शनामधे करण्यात येत आहे.