
रवी जाधव
देऊळगाव राजा:-२२वर्षीय तरुणाने चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन तरुणीवर लेंगिक अत्याचार केला होता.त्यामुळे मुलीच्या तक्रारी वरून अंढेरा पोलिसांनी ३ डिसेंबर रोजी आरोपी रामू ज्ञानू खेडेकर रा अंत्री खेडेकर यांच्या विरुद्ध विविध कलमा सह ओट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता आरोपीला चार दिवसाची पीसीयर सुनावला आहे.अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्री खेडेकर गावातील एक १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एक २२वर्षीय नराधमाने चाकूचा धाक दाखवून अनेकवेळा तरुणीवर अत्याचार करीत लेंगिक छळ केला होता.त्याच्या पासून तरुणीला गर्भधारणा सुद्धा झाली होती.त्यामुळे तरुणीने आरोपीस लग्नाची मागणी केली मात्र लग्न करण्यात नकार दिल्याने अखेर तरुणीने पोलीस स्टेशनला आई व भावजी यांना सोबत आणून आरोप विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.अल्पवयीन तरुणीच्या तक्रारी वरून ठाणेदार गणेश हिवरकर यांनी आरोपी रामू ज्ञानू खेडेकर रा अंत्री खेडेकर वय २२वर्ष याच्या विरुद्ध कलम ३७६,२(ह),३२३,५०६,२(१),(आर)(एस)(डब्ल्यू)भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करुण अटक करून आरोपीला बीट अंमलदार सिरसाट, समाधान झिने,सोनकांबळे यांनी न्यायालयात हजर केले असता आरोपीला चार दिवसाचा पीसीयर सुनावला.या धास्तीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.











































