Home बुलडाणा चक्क पोलिसांनी महिलेच्या घरात घुसून केली शरीर सुखाची मागणी

चक्क पोलिसांनी महिलेच्या घरात घुसून केली शरीर सुखाची मागणी

1094

 

पोलिसांवर गुन्हा दाखल ,

अमीन शाह

 

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामोद येथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका महिलेच्या घरात घुसून तिला शरीर सुखाची मागणी केली ही घटना 25/11/2021 रोजी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून उघडकीस आली , जामोद पोलिस चौकी वर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस कर्मचारी दाते व सांदुके या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी महिलेच्या घरात कुणी नसतांना रात्री 8,30 वाजताच्या दरम्यान तिचे घराचे बंद द्वार तोडून घरात घुसून महिलेस अश्लील संभाषण करून शरीर सुखाची मागणी केली व तिचा विनयभंग केला व दाते मेजर व संदूके या दोन पोलिस कर्मचाऱ्यां विरुद्ध फिर्यादि ने जळगाव जा पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल केली पीडित महिले च्या तक्रारी वरून अप / क , 0953/2021 कलम 353,353 a , 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शन खाली सचिन वाकडे करीत आहेत , घडलेल्या घटने मूळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून एकच चर्चा केली जात आहे ,