
. अल्पवयीन तरुणी सात महिन्याची गरोदर .
. तरुणांविरुद्ध ऑट्रोसिटी सह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल .
हनिफ शेख ,
अंढेरा ता. चिखली : – २२ वर्षीय तरुणाने एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करुण वारंवार चाकू चा धाक दाखवून जबरदस्तीने बलात्कार केला .त्यामुळे तरुणी गरोदर राहली . आणि हा प्रकार तरूणीने तिच्या प्रियकराला सांगितला असता त्याने बाळ पाडायचे नाही पाडले तर तुला जिवाने मारुण टाकीन अशी धमकी दिली . मुलीला घरी उलट्या झाल्याने आई वडिलांच्या मुलगी गरोदर असल्याचे लक्षात आले . त्यामुळे आई वडिलांनी मुलीला घेवून पोलीस स्टेशन गाठले तक्रार दाखल केली . या तक्रारी वरुण अंढेरा ठाणेदार यांनी आरोपी विरुद्ध ऑट्रोसिटी सह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन तरुणीने पोलीस स्टेशनला येवून तक्रार दाखल केली की ,मी एक मागासवर्गीय असून आई वडील शेतमजूरी करतात . आम्ही दोन बहिणी एक भाऊ आहेत मोठीचे लग्न झाले . माझे शिक्षण इयत्ता 10 वी पर्यंत झाले आहे. मागील दोन वर्षापुर्वी मी शाळा
सोडली असुन शेतमजुरीचे काम करते. आमचे गावातील राहणारा रामु ज्ञानु खेडेकर याला मी लहान पणापासुन आठळखते.माझी आई बहिणीच्या डिलीव्हरी तिच्या सासरी गेली होती त्यामुळे एक बहीण व भाऊ असमही घरी राहत होतो. त्यादरम्यान रामु ज्ञानु खेडेकर याचे आमचे घरी येत जात होता. व मला म्हणायचा की, माझे तुझयावर फार प्रेम आहे व तु मला खुप आवडते असे म्हणत होता, व माझा मोबाइलवर नेहमी बोलत असे की तु मला आवडते व आपण दोघे लग्न करु असे म्हणत होता. मी शेतात
मजुरीने कामाला जात असतांना तोपण माझ्या सोबत मजुरीने कामाला येत होता. त्यामुळे आमच्यात प्रेमसंबंध वाढल्याने आम्ही शेतातच भेटत असल्याने आमचे नेहमी शारिरीक संबंध येत गेले . आमचे प्रेमसंबंधाबाबत त्याच्या आणि माझ्या घरच्यांना सर्व हकीकत माहिती झाल्याने दोघांच्या घरच्यांनी आम्हाला समजुन सांगितले होते. त्यानंतर मी सोबत संबंध तोडलेले होते. परंतु माझी इच्छा नसताना सुध्दा माझे घरी येवुन चाकुचा धाक दाखवुन माझेवर जबरदस्ती संभोग करीत होता. व मला चापटाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. त्याने मारल्याने माझ्या डाव्या कानावर चापट मारल्याने तेव्हापासुन डाव्या कानाने कमी एकायला येत आहे. याबाबत तु जर तुझ्या आई वडीलांना सांगितले तर तुला या चाकुने जीवाने मारुन टाकीन अशी धमकी देत होता. त्याच्या पासून मला दिवस गेलेले आहे असे जाणवले म्हणुन मी त्याला सांगितले मात्र तो म्हणाला की आपल्याला हे बाळ पाडायचे नाही दिवस गेल्याने मला सारख्या सारख्या उलट्या झाल्या म्हणुन माझी आई ने माझे पोट पाहुन मला दिवस असल्याचे सांगीतले. त्यामुळे आई व दाजी यांनी माझ्या प्रियकराला रामु फोन करुन सदर घटनेबाबत विचारपुस केली
असता तो आम्हाला म्हणाला की, तुम्ही जर हे बाळ पाडले तर तुम्हाला जीवाने मारुन टाकीन अशी धमकी दिली.मला वेळोवळी लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार शेतात व आमचे राहते घरी जबरदस्तीने मारहाण करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन माझेवर शारिरीक संबंध केले आहे. अशी तक्रार मुलीने अंढेरा पोलीस स्टेशनला येवून दाखल केली . मुलीच्या तक्रारी वरुण ठाणेदार गणेश हिवरकर यांनी आरोपी रामू ज्ञानू खेडेकर रा अंत्री खेडेकर वय २२ वर्ष यांच्या विरुद्ध कलम ३७६,२(n),३२३,५०६,(२),पोस्को ४.६ , या.जा.ज. का.कलम ३(१),(r)(s)(w) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .











































