
आरोपीस अटक ,
अमीन शाह
बुलडाणा ,
प्रेम हे प्रेमंच असते, तुमचे आमचे सेम असते..प्रियशीला जिवापाड जपायचे असते. परंतु मोताळा शहरात काही विपरीतच घडले. चार वर्षापासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशीप मध्ये राहणा-या प्रियकराने आपल्याच प्रियसीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्घूण खून केल्याची घटना आज ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. प्रियकर आरोपीला बोराखेडी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार बोराखेडी येथे राहणारा गजानन गणेश सोनुने (वय ४०) व पंचफुला येखनार (वय ३६) हे मागील चार वर्षापासून लिव्ह अॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. पंचफुला येखनार यांचा विवाह २० वर्षापासून शंकर येखनार यांच्याशी झाला होता. त्यांना तीन मुली व मुलगा असे अपत्ये आहे. ती बोराखेडी येथील गजानन सोनुने याच्यासोबत ४ वर्षापासून राहत होती. आरोपी गजानन हा पंचफुलाला दारु पिवून नेहमी त्रास देवून मारहाण करीत होता. त्यांच्यात आता दररोज भांडण होत होते. या भांडणाचे रुपांतर २९ नोव्हेंबर रोजी कडाक्याच्या भांडणात झाले. आरोपी गजानन सोनुने यांने पंचफुला हीला मारहाण करुन तिच्या डोक्यात दगड टाकला, जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यातच पंचफुलाचा मृत्यू झाला. सदर घटना शहरापासून जवळच असलेल्या खरबडी शिवारात आज मंगळवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. मृतकाचे वडिल आसाराम यदमल यांनी आरोपी गजानन सोनुने याने मुलगी पंचफुला हीला ‘ठार मारल्याची फिर्याद बोराखेडी पोस्टे.ला दिली. सदर फिर्यादीवरुन आरोपी गजानन सोनुने याच्यावर भादंवीचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला बोराखेडी पोलीसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारी हे करीत आहेत ,











































