
पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन….
बुलडाणा/प्रतिनिधी
बुलडाणा ग्रामीण आणि शहरी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधीचे अधिकारी आणि शासनाशी मंत्र्याशी चर्चा करून समस्या सोडवू असे आशवासन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी दिले,
आमदार शिंदे ह्या अनुसुचित जाती कल्याण समिती प्रमुख असुन त्या तीनदिवस जिल्हा दौऱ्यावर होत्या त्यांनी पत्रकार परिषद घेऊन दौऱ्यावर असतांना त्यांनी केलेल्या कामांचा आढावा थोडक्यात विषद करून पत्रकारांशी संवाद साधला.या वेळी पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने निवेदन देण्याचे आले,
पत्रकारिता हि लोकशाही मधील चौथा स्तंभ असून समाजातील चांगल्या- वाईट घटना दररोज समाजाला देण्याचे काम करतो ,या सर्व कामात ग्रामीण पत्रकाराची महत्वाची भूमिका असते, पत्रकारितेचा पाया ग्रामीण भागावर आहे ,मात्र राज्य सरकार कडून ग्रामीण पत्रकार हा घटक दुर्लक्षित आहे ,म्हणून शहरी किंवा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना सोई सवलती दिल्या जाते त्याच प्रमाणे ग्रामीण पत्रकारांना सुद्धा देण्यात यावा
केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा मंजूर केला त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि हा कायदा ग्रामीण पत्रकारांना लागू करावा ,ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यात यावी ,अधिस्वीकृती मिळण्याकरिता त्यातील अटी शिथिल कराव्या,राज्य सरकारच्या शासकीय समितीवर अशासकीय सदस्य निवडतांना पत्रकार संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी,
अधिस्वीकृती धारक पत्रकारांना मिळणाऱ्या सोयी बस प्रवास,रेल्वे प्रवास,टोल नाका सवलत,आरोग्य सेवा ,आदी सेवा त्वरित लागू कराव्या , ग्रामीण पत्रकारांना घरकुल योजना मिळण्यासाठी ग्रामपंचायती मध्ये पत्रकारांना राखीव घरे करावी,ग्रामीण पत्रकारांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे ,खाजगी अथवा शासकीय कॉन्व्हेट मध्ये पत्रकारांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्या,या मागण्याचे निवेदन पत्रकार संरक्षण समितिच्या वतीने जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे,जिल्हाकार्याध्यक्ष बाबासाहेब जाधव, जेष्ट पत्रकार प्रा सुभाष लहाणे,निलेश जोशी,जिल्हा उपाध्यक्ष रामदास कहाळे,प्रेम राठोड, लक्ष्मीकांत बगाडे,संदीप वानखेडे, निलेश राऊत,समाधान चिंचोले,रमेश खंडारे,शौकत शाह,साबीर अली,इसरार देशमुख आदींनी दिले या वेळी आमदार लहुजी कानडे व इतर समीती सदस्य उपस्थित होते.











































