Home मराठवाडा जगात पैशाने श्रीमंत असणारी माणसं खूप आहेत परंतू दानशूर थोडेच असतात..

जगात पैशाने श्रीमंत असणारी माणसं खूप आहेत परंतू दानशूर थोडेच असतात..

102

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

कालच्या युवा शेतकरी संघर्ष समितीच्या हलगी मोर्च्या दरम्यान ज्ञानेश्वर दिवटे या शेतकरी पुत्रांनी आपले मनोगत व्यक्त केले .त्याने संगितले की माझ्या बापाने साडेचार एकर जमीन ठोक्याने घेतली असून आज रोजी झालेल्या नुकसानीने आम्हला यावर्षी एक रुपया देखील उत्पन्न मिळणे कठीण आहे .मग हे पैसे फेडायचे कसे ?असं म्हणून तो मुलगा अक्षरशः रडू लागला ,सर्वानाच गहिवरून आले ..
त्याच दुःख व सर्वांनाच निरुत्तर करणारा प्रश्न ऐकून सारे स्तब्ध झाले होते .
पण या शेकडोंच्या गर्दीमध्ये एक संवेदनशील,दातृत्ववान व तत्पर अस युवा नेतृत्व बसलेलं होतं ते म्हणजे ‘विश्वजित खरात’ .
त्यांनी तात्काळ युवा शेतकरी संघर्ष समितीशी संपर्क केला व मी त्या मुलाला त्याची एक वर्षाची ठोक्याची पूर्ण रक्कम व्यक्तिशः देत आहे अशी ग्वाही दिली व आम्ही सर्व आंदोलकसमोर त्यांची घोषणा मांडली सर्वांनी टाळ्यांचा गजरात त्यांचं स्वागत व अभिनंदन केलं …
आज तत्परतेने विश्वजित खरात यांनी समितीकडून त्या शेतकरीपुत्राची सर्व माहीती घेऊन लगेच घनसावंगीला हजर झाले. सर्वजन राम गव्हाण खुर्द येथे शेतकरी पुत्राच्या घरी मदत देण्यास पोहचले. विश्वजीत खरात स्वतः आपल्या हातानी ती मदत ज्ञानेश्वर दिवटे या शेतकरी पुत्रांकडे सुपूर्त केली .
सर्व गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला व आभार व्यक्त केले …
जगात पैशाने श्रीमंत असणारी खूप माणसं आहेत पण दातृत्व असणारी थोडेच असतात. या कार्याला युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने धन्यवाद दिले.