Home बुलडाणा रस्त्यावर नाचणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल ,

रस्त्यावर नाचणाऱ्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल ,

691

 

 

उडाली खळबळ ,

अमीन शाह

बुलडाणा , काल सायंकाळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड हे औरंगाबाद येथून बुलडाणा येथे परत येत असतांना सरंबा फाटा देऊळगाव मही येथे त्यांना ट्राफिक जाम झालेला दिसला ट्राफिक जाम का झालं हे आमदार महोदयांनी पाहिले असता रोडवर काही तरुण मधधुंद अवस्थेत रस्त्यावर पोलीस लिहलेली कार आडवी लावून नाचत असल्याचे दिसून आले हे पाहताच आमदार संजय गायकवाड यांचा पारा चढला व त्यांनी या तरुणांना चांगलेच धारेवर धरले आमदाराचा रौद्र रूप पाहताच हे तिघे ही तरुण पोलीस लिहलेल्या कार नंबर mh 28 a n 3641 मध्ये बसून पळून गेले होते ,

तो निघालं पोलीस कर्मचारी ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार रस्त्यावर जे तरुण नाचत होते त्या पैकी एक पोलीस कर्मचारी होता बीबी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर विजय सुखदेव पवार हे कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे ,

गुन्हा दाखल ,

या संदर्भात आत्ताच हाती आलेल्या माहिती नुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय पवार पो , स्टे , बीबी , योगेश गोविंद राठोड रा , बीबी , रामदास खुशाल गावडे रा , हत्त , लोणार , या तिघावर पो , हे , का , रामेश्वर जायभाये यांच्या तक्रारीवरून कलम 283 भा ,द वी , सह कलम 85 1 मुंबई दारूबदी कलम 110 , 117 , नुसार देऊळगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये कार्यवाही करण्यात आली आहे या घटने चा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण खाडे हे करीत आहे ,