Home बुलडाणा बँकेच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची फरफट !

बँकेच्या चुकीमुळे शेतकऱ्यांची फरफट !

332

शेतकऱ्यांच्या नावाचा धनादेश दुसऱ्याच्या खात्यात केला जमा

सेंट्रल बँक देऊळगाव मही शाखेतील प्रकार .सहकार मंत्र्यांचे चौकशी चे आदेश..

प्रतिनिधी( रवि जाधव)

देऊळगाव मही :-देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील सेंट्रल बँकेने पाडळी शिंदे येथील शेतकरी सुभाष पांडुरंग मिसाळ या शेतकऱ्याच्या नावाचा२०६२७रुपयांचा धनादेश तीन वर्षांपूर्वी दुसऱ्याच्या खात्यात जमा केला असून या शेतकऱ्यांची फरफट बँकेच्या चुकीमुळे व सेन्ट्रल बँक देऊळगाव मही यांच्या भोंगळ कारभारामुळे होत असून शेतकरी मेटाकुटीला आला असून वारंवार तीन वर्षांपासून बँकेचे उंबरठे शेतकरी आपल्या धनादेशाची रक्कम आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर बँकेत चकरा मारत असून त्या शेतकऱ्यांने १७ जुलै रोजी सेन्ट्रल बँक शाखा व्यवस्थापक देऊळगाव मही यांना लेखी पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की ,मी सन २०१८साली धनादेश क्रमांक ४४५४६० या नंबर चा निर्मल सिड्स कम्पनी कडून मिळालेला २०६२७रुपयांचा चेक मी माझ्या बचत खात्यात खाते क्रमांक ३३१५०५३२०६मध्ये जमा करण्यासाठी शाखेत जमा केला होता परंतु सेन्ट्रल बँकेने सदर धनादेशाची रक्कम सुभाष मिसाळ यांच्या खात्यात जमा न करताच ती रक्कम दुसऱ्याच्या खात्यात जमा केली धनादेशाचे पैसे जमा झाले का हे मी पाहण्यासाठी गेलो असता सदर रक्कम बँकेने दुसऱ्याच्या खात्यात जमा केली असल्याचे तत्कालीन अधिकारी यांनी मला सांगितले व त्यानी लगेच धनादेशाची रक्कम ज्या खात्यात जमा केली त्या खाते धारकाला पत्र व्यवहार करून सदर रकमेबाबत खातर जमा करून पैसे परत करण्याचे पत्र बजावून आठ दिवसात सदर रक्कम परत करण्याचे आदेशीत केले होते व न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला होता परंतु त्यास तीन वर्षांचा कालावधी लोटून सुद्दा सेन्ट्रल बँकेने त्या खाते धारकाकडून पैसे परत करून व न दिल्यास कारवाई करून ही रक्कम सुभाष मिसाळ या शेतकऱ्याला त्याचा हक्काची धनादेशाची रक्कम दिली नाही उलट पक्षी तो शेतकरी आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर बँकेचे उंबरठे झिंजवीत राहिला अखेर शेतकऱ्याकडून १७जुलै रोजी सेन्ट्रल बँक व्यवस्थापक देऊळगाव मही यांना निवेदन देण्यात आले व सदर प्रकाराबद्दल माझी चूक नसतानाही माझे हक्काचे शेतमालाचे पैसे मला तीन वर्षांपासून मिळाले नसून ते आठ दिवसांत देण्याची मागणी केली असून शेती साठी मला सदर पैशाची नितात गरज असून आठ दिवसात न मिळाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल यास सर्वस्वी बँक व्यवस्थापक जबाबदार राहील असा इशारा दिला आहे.सेन्ट्रल बँक व्यवस्थापक यांच्या भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

“सदर धनादेश प्रकरणा बाबत चौकशी करून सदर शेतकऱ्यास न्याय देण्यात येईल

श्री हेडाऊलीड बँक व्यवस्थापक बुलढाणा”

“सदर धनादेश प्रकाराबद्दल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बुलढाणा यांना देण्यात आले असल्याची माहिती सहकार मंत्री मा श्री.ना. बाळासाहेब पाटील
मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी प्रतिनिधी याना भ्रमणध्वनी द्वारे दिली.