Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत, बँकेचा वर्धापनदिन साजरा

कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत, बँकेचा वर्धापनदिन साजरा

267

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत बॅंकेचा १२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी एस.जी. मोदीराज यांच्या हस्ते गरिब महीलांना साड्या वाटप करण्यात आल्या, तसेच अनेक शेतकऱ्यांना फळ झाडांची रोपं वाटप करण्यात आली.यावेळी बँक अधिकारी एस. जी .मोदीराज यांच्यासह विजय पाटील,सर्वश्री अंभोरे,पवन राऊत, सिद्धार्थ कंटुले, गुंजकर, तसेच बँक ग्राहक व शेतकरी बांधव उपस्थित होते.ग्रामिण बँकेच्या वतीने गरिब महीलांना साड्या वाटप करण्यात आल्याबद्दल तसेच शेतकऱ्यांना फळ झाडांची रोपं वाटप केल्याबद्दल,या स्तुत्य उपक्रमास नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.