
मलकापूर पांग्रात भगवान उगले यांनी घेतला सरपंचाचा पदभार
भगवान साळवे
महाराष्ट्रात कुठे झाले असेल तर माहित नाही मात्र कदाचित बुलढाणा जिल्ह्यात अशी घटना प्रथमच घडली आहे राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही याचाच प्रत्यय मलकापूर पांग्रा येथील ग्रामपंचायत मध्ये बघायला मिळाला येथील सरपंच सुट्टीवर गेल्याने सरपंच पदाचा प्रभार येथील उपसरपंच यांच्याकडे आला आहे उपसरपंच असलेले भगवानराव उगले यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे
सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा हे गाव सुमारे आठ हजार लोकसंख्येचे आहे या गावा ची बाजारपेठ मोठी असून येथील गुरांचा बाजार जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे येथील ग्रामपंचायत ची सदस्य संख्या 13 आहे गत सहा महिन्यापूर्वीच निवडणुका झाल्या होत्या सरपंच पद हे ओबीसी महिला करिता राखीव होते या ग्रामपंचायत मध्ये भगवानराव उगले यांच्या पॅनल ला निर्विवाद बहुमत मिळाल्याने सरपंच पद याच पॅनलच्या अनिता बंडू उगले या झाल्या होत्या तर उपसरपंच म्हणून भगवानराव उगले यांची अविरोध निवड झाली होती दरम्यान सरपंच अनिता उगले यांनी सुट्टीचा अर्ज दिल्याने त्यांची सुट्टी मंजूर झालेली त्यामुळे रिक्त असलेल्या पदावर उपसरपंच भगवान उगले यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार आला आतापर्यंत सरपंच ची निवड न झाल्यामुळे, सरपंच पद रिक्त राहिल्यामुळे ,अथवा सरपंच पद काही कारणामुळे रद्द होऊन सरपंच पायउतार झाल्यामुळे अशा ठिकाणी सरपंचाची पुढील निवडणुकीपर्यंत सरपंच पदाचा पदभार उपसरपंच कडे येतो मात्र मलकापूर पांग्रा येथे बहुदा जिल्ह्यात प्रथमच सरपंच हे रजेवर गेल्याने त्यांचा पदभार उपसरपंच त्यांच्याकडे आला आहे महाराष्ट्रामध्ये अशा घटना बहुदा खूप कमी घडल्या असतील राजकीय दृष्ट्या सरपंच हे रजेवर गेल्याने त्यांचा पदभार उपसरपंचाकडे आल्याने या घटनेची चर्चा सर्वत्र गावा गावात राजकारनात बघायला मिळत असून अशा घटनांची पुनरावृत्ती भविष्यात गाव खेड्याच्या राजकारणामध्ये मध्ये यापुढे बघायला मिळतील यात मात्र शंका नाही दरम्यान उपसरपंच भगवानराव उगले यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारला असून ग्रामपंचायत स्तरावरील सर्व खातेबदल सह्या करण्यात आल्या आहेत यावेळी ग्रामसेवक उध्दव गायकवाड पत्रकार भगवान साळवे यांनी सरपंच उगले यांचा सत्कार केला यावेळू गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून गावकर्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच भगवान उगले यांनी केले आहे











































