
जालना- लक्ष्मण बिलोरे
मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीज् बंद पडून सहा वर्षे झाली आहेत. मैत्रेय मॅनेजमेंटवर फसवणूक प्रकरणी नाशिक येथील सरकार वाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून मैत्रेय प्रकरण न्यायप्रविष्ट आहे . न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने मैत्रेयच्या प्राॅपर्टीज जप्त केल्या आहेत . परंतु शासन आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लिलाव प्रक्रियेस विलंब होत असुन मैत्रेय मध्ये गुंतवणूक केलेला घामाचा,कष्टाचा , हक्काचा पैसा गुंतवणूकदार लोकांना अजूनही मिळत नाही.तरी या प्रकरणी लक्ष देवून मैत्रेय परतावे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी गळ गुंतवणूकदारानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांना घातली आहे. परतावे लवकर मिळावे यासाठी अन्न नागरी पुरवठा मंत्री.व नाशिक जिल्हाचे पालकमंत्री मा.ना.छगन भुजबळ साहेब यांना नाशिक जिल्ह्यातील मैत्रेय प्रतिनिधींनी भेट घेऊन लवकरात लवकर परतावे मिळावे यासाठी निवेदन देऊन सविस्तर मैत्रेय प्रकरण बाबत माहीती दिली मा.भुजबळ साहेबांकडून मा. गृहमंत्री यांच्याबरोबर चर्चा करण्याबाबत हमी दिली आहे.व शिफारस पत्र सोमवारी संपर्क कार्यालय मधुन देणार आहेत.
*शरद काशिनाथ हिरे , महेंद्र वसंत अमृतकर,विक्रम सोपान डुबे ,गोपाल बडगुजर ,ज्ञानेश्वर कमानकर ,अनिल कोठावदे व इतर नाशिक मैत्रेय प्रतीनीधी उपस्थित होते. यासाठी मैत्रेय प्रतिनिधी यासिन सयद, डॉ.हरणपळी यांनी परिश्रम घेतले.











































