Home बुलडाणा देऊळगावमही येथे सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे पॅनलचे वर्चस्व कायम

देऊळगावमही येथे सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे पॅनलचे वर्चस्व कायम

341

17 उमेदवारा पैकी 11 उमेदवार विजयी

 

रवी जाधव ,

देऊळगाव मही – नुकत्याच जाहीर झालेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायत निकालाचा कौल सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे पॅनलच्या 11 उमेदवारांचा विजय झाला असून
मतदारसंघातील देऊळगावमही ह्या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचयातीत गावात एक हाती सत्ता आल्याने सहकार महर्षी स्व. भास्कररावजी पॅनलचे देऊळगाव मही येथे वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

तर देऊळगाव महीतील सहकार महर्षी स्व. भास्कररावजी शिंगणे पॅनलचे सर्व विजयी उमेदवार वंदनाताई भगवान शिंगणे जोत्सनाताई वासुदेव, सय्यद नफिसाबी हबीब,मोहम्मद अतिक मोहम्मद आता,फरजानाबी शेख रब्बानी, कमलताई उमेश,खिल्लारे वनिताताई विवेक,खरात
गजानन मधुकरराव, पूजाताई सचिन, इंगळे सुनीताताई आनंता,म्हस्के लक्ष्मीताई रामकीसन तसेच रियाज खान पठाण, भिकुसेठ शिंगणे,राजु सेठ डुंगरवाल,सुभाष दादा शिंगणे, रविभाऊ इंगळे,सुभाष इंगळे, नितीन नाना शिंगणे,ताहेर भाई, पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले असून आता निवडणूक संपली आहे, निवडणुकीच्या कारणावरून कोणीही आपसात वाद करू नये वातावरण खराब करू नये, आता फक्त गावाच्या विकासाचा विचार करावा असे आवाहन केले आहे.