Home बुलडाणा तालुक्यातील अवैध धंद्याची गतिमान होत असलेली चक्रे थांबवा.

तालुक्यातील अवैध धंद्याची गतिमान होत असलेली चक्रे थांबवा.

411

तालुक्यातील अवैध धंद्याची गतिमान होत असलेली चक्रे थांबवा.

सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिडके यांची जीलहा पोलिस अधिक्षक यांच्याकडे मांगणी ,

देऊळगावराजा , प्रतिनिधी

सध्या स्थितीत जगातील अनेक देश करोना सारख्या संसर्गजन्य आजारांशी दोन हात करतांना सर्वसामान्य माणसाला जिवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.त्यामुळे भारतासह जगातील अनेक देशाची आर्थिक परिस्थिती मंदावली आहे. या मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीत देऊळगाव राजा तालुक्यातील अवैध धंद्यांचे चक्रे मात्र गतिमान झाली आहेत.ते गतिमान झालेले अवैध बंद करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिडके यांनी पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात अवैध धंद्याचा उल्लेख करतांना सांगितले आहे की महाराष्ट्र शासनाने सुरुवातीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाकडाऊन सर्व प्रथम जाहिर केला होता. त्या तत्कालीन परीस्थितीत देऊळगाव राजा तालुक्यात प्रशासकीय अधिकांऱ्याच्या अचुक नियोजनामुळे रुग्ण संख्या अत्यंत कमी प्रमाणात होती. मात्र नंतर राज्य शासनाने लाकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर तालुक्यातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना शासनाने ठरवुन दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन व्यवसाय सुरु करण्यात आले. तेव्हाच प्रसाकीय अधिकाऱ्यांची नजर चुकवुन अवैध धंद्याची पाय रोवण्यास सुरवात झाली.यामध्ये जुगार, वरली मटका,अवैध दारु विक्री,गुटखा विक्री यासह अनेक अवैद्य व्यावसाय सुरु असुन त्या व्यावसायिकास कुणाचा आशिर्वाद आहे असा उल्लेख त्यांंनी निवेदनात करुन स्थानिक प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी वरली मटक्यासह जुगारांचे अड्डे यासह विविध प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहे,या अवैध व्यावसायिकांना स्थानिक प्रशासनाचा कुठल्याच प्रकारचे भय नसल्याचे चित्र त्याच्या कृतीतुन दिसत आहे त्यामुळे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो व अवैद्य व्यावसायामुळे स्थानिक तरुणाच्या भरकटत चाललेल्या भविष्याला माणुसकीच्या भावनेतुन पाहुन सामाजिक बांधिलकी जोपासावी असा भावनिक उल्लेख मंगेश तिडके यांनी निवेदनात केला आहे.