Home विदर्भ कारंजा टोल नाका येथील 1,24,59,080 रुपयाची अफरातफर प्रकरणी पोलीस स्टेशन कारंजा येथील...

कारंजा टोल नाका येथील 1,24,59,080 रुपयाची अफरातफर प्रकरणी पोलीस स्टेशन कारंजा येथील गुन्हयातील मागिल दिड वर्षापासुन फरार असलेल्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

708
0

ईकबाल शेख

वर्धा – वर्धा जिल्हा कारंजा (घाडगे) येथील ओरीएंटल पाथवेज प्रा.लि टोल नाका येथील 1) हेड अकाउंटंट विजयरामाराव कोंडुमुरु, वय 42 वर्ष, रा. दामी सिटी, वारी स्ट्रीट कावली, जि. नेल्लोर, (आ.प्र.) व 2) ॲडिशनल जनरल मॅनेजर हर्षित अग्रवाल, वय 43 वर्ष, रा. कारंजा (घाडगे) यांनी दिनांक 01.01.2017 ते 21.08.2019 चे दरम्यान टोल नाक्यावर जमा झालेल्या पैशातुन 1,24,59,080/- रुपयाची अफरातफर केली व त्यांनी सदर अफरातफर केल्याचे मान्य केले परंतु सदर रक्कम कंपनीला परत केली नाही. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. कारंजा (घाडगे) येथे अप.क्र. 277/2019 कलम 406,408, 34 भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी क्र. 1) हेड अकाउंटंट विजयरामाराव कोंडुमुरु, वय 42 वर्ष याला दिनांक 12.03.2020 रोजी त्याचे मुळ गावी दामी सिटी, वारी स्ट्रीट कावली, जि. नेल्लोर, (आ.प्र.) येथुन अटक करण्यात आली होती.

तसेच गुन्हयातील आरोपी क्र. 2) ॲडीशनल जनरल मॅनेजर हर्षित अग्रवाल, वय 43 वर्ष, रा. कारंजा (घाडगे) हा गुन्हा घडल्याचे दिनांक 21.08.2019 पासुन जवळपास दिड वर्ष फरार होता. सदर आरोपी हा पुणे येथे असल्याची गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने सदर माहीतीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेतील पथक पुणे येथे रवाना करण्यात आले व सदर गुन्हयातील मुख्य आरोपीस तो हल्ली राहत असलेल्या जवळकर चाळ, कासरवाडी, पुणे येथुन मोठया शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पोहवा. संतोश दरगुडे, चंद्रकांत बुरंगे, राजेश तिवसकर, श्रीकांत खडसे, प्रदिप वाघ व सायबर शाखा यांनी केली.